Friday, 13 November 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यांनतर वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर हळुहळु 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यांनतर वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर हळुहळु 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 नोव्हेंबर व दिनांक 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे  राहण्याची शक्यता आहे.

संदेश : उपलब्ध पाण्याची खात्री व पुरेशी उपलब्धता लक्षात घेऊन करडई व हरभरा या पिकांची योग्य निवड करून लवकरात लवकर पेरणी करावी. पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी वव्यस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या खरीप ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी.

काढणीस तयार असलेल्या बाजरी पिकाची काढणी करून घ्यावी.

काढणीस तयार असलेल्या ऊस पिकाची काढणी करून घ्यावी. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% 60 मिली किंवा ॲसिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी मात्र मित्र किडींची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी एकाच प्रकारच्या किटकनाशकाची वारंवार फवारणी न करता वेगवेगळया कार्यपध्दतीच्या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली प्रति एकर फवारावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, रोगग्रस्त पाने वेळोवेळी गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत व शेत स्वच्छ ठेवावे. याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50% 400 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75 % 500 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % 500 ग्रॅम फवारणी करताना चांगल्या प्रतीचे चिकटवणारे द्रव्य मिसळावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲझॉक्सीस्ट्रोबिन 18.2 % + डायफेनोकोनॅझोल 11.4 % 200 मिली किंवा प्रोपिकोनॅझोल 25 % प्रवाही 200 मिली किंवा क्लोरोथॅलोनील 75% 500 ग्रॅम कमीत कमी 125 लिटर पाणी प्रति एकर या प्रमाणे स्टिकर सह सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. हळद पिकात कंदकूज रोगाच्या व्यवस्थापनासाठी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे. कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास खालीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची जमिनीतून आळवणी करावी. मॅन्कोझेब 75% 3 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी व क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जमिनीतून आळवणी करावी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिन्यातून एकदा अळवणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल्या कंदावर कंदमाशीची मादी अंडी घालते. त्यामुळे उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकावेत व वेळेवर भरणी करावी. एकरी 2 ते 3 पसरट तोंडाची भांडी ठेवून प्रत्येक भांड्यात 200 ग्रॅम भरडलेले एरंडीचे बी व 1 ते 1.5 लिटर पाणी घ्यावे. 8 ते 10 दिवसांनी तयार होणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होऊन त्यात पडून मरतात.सध्या अनेक ठिकाणी हळद पिकामध्ये पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. पालाशाच्या कमतरतेमध्ये जुन्या पानांच्या कडा पिवळसर होऊन नंतर तपकिरी व करपल्यासारख्या दिसतात. त्यामुळे अशा लक्षणांना केवळ करपा समजून बुरशीनाशकाची फवारणी करू नये.विद्यापीठाने केलेल्या शिफारसीनुसार खतांचा योग्य डोस द्यावा.पालाशाची कमतरता दिसून आल्यास सल्फेट ऑफ पोटॅश (0:0:50) 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.ग्रेड-II सूक्ष्म अन्नद्रव्ये घन स्वरूपासाठी 5 ग्रॅम किंवा द्रवरूपासाठी 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरावे. आवश्यकता असल्यास आणि पिकाची अवस्था विचारात घेऊन 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी पुन्हा एकदा करावी.

पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी ज्वारी पिकात अंतरमशागतीच कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

पेरणी केलेल्या करडई पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याच्या उपलब्धतेनूसार बागायती रब्बी करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती करडई पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व  30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे.

पेरणी केलेल्या हरभरा पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हरभरा पिकात अंतरमशागतीच कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पाण्याच्या उपलब्धतेनूसार बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. तर मूळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10  ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीची अवस्था असल्याने पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी  00:52:34 या विद्राव्य खताची 1.5 किलो +  चिलेटेड झिंक 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बागेत ओलावा टिकून राहण्यासाठी खोडाजवळ आच्छादन करावे.

डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. डाळींब बागेत तेल्या रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. बागेत ओलावा टिकून राहण्यासाठी खोडाजवळ आच्छादन करावे.

चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत ओलावा टिकून राहण्यासाठी खोडाजवळ आच्छादन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पाण्याच्या उपलब्धतेनूसार बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करावी.

फुलशेती

फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पाण्याच्या उपलब्धतेनूसार फुलपिकांची लागवड करावी.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे. पशुधनासाठी चारा म्हणून लागवड केलेल्या पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

                                      सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 65/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 13.11.2026

 

No comments:

Post a Comment