Thursday, 12 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होईल. दिनांक 16 व 17 जानेवारी दरम्यान बीड व लातूर जिल्हयात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होईल. दिनांक 16 व 17 जानेवारी दरम्यान बीड व लातूर जिल्हयात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 13 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 20 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. 

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रब्बी पिकास, फळबागेस, भाजीपाला पिकास, फुलपि कास, रोपवाटीकेस रात्री हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम हरभरा पिकास होऊ नये म्हणून पिकास रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 200 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम करडई पिकास होऊ नये म्हणून पिकास रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  गहू पिकास हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून घ्यावेत (घडांना सर्क्टींग करावी). केळी बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. केळी बागेत करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे, जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.  द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे.

भाजीपाला

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे भाजीपाला पिकास रात्री सिंचन करावे. भाजीपाला पिकात 2 टक्के 13:00:45 ची फवारणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेंडाझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी. मकर संक्रांतीमूळे बाजारपेठेत काही भाज्यांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या भाज्यांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

फुलशेती

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुल पिकास रात्री सिंचन करावे. मकर संक्रांतीमूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

 

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे (तापमान 6 ते 8 अं.से. पर्यंत खाली आल्यामूळे) मुख्यता करडे, कोंबडीची पिल्ले व एकुणच लहान जनावरांच्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो. गारठणे (चिलींग) किंवा कधी कधी बर्फाचे चावणे (फ्रॉस्ट बाईट) ई. समस्या उदभवतात. गारठण्यामूळे पुढे घातक न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह) तर बर्फाच्या चावण्यामुळे पुढे गँग्रीन सारख्या समस्या उदभवू शकतात (मुख्यता बर्फाळ प्रदेशामध्ये). मुख्यता कोंबड्यांमध्ये थंडीमूळे कोरायझा हा आजार उदभवतो, तर करडांमध्ये देखील मरतुक वाढण्याची भिती वाढते. आपल्या जनावरांना अधिक उब कशी मिळेल ते पहा जसेकी पोत्यांचे पडदे लावून गोठ्यामध्ये उब निर्माण करणे मोठा बल्ब लावणे, गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, दिवसा पडदे  काढून उन्हामूळे मिळणारी उष्णता निर्माण करणे, पाण्यामधून रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी जसे की ई-केअर सी, ईम्यूनोलाईट पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देण, शक्यतो उष्ण पाणी (बोरचे ताजे पाणी) देणे.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 83/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 13.01.2023

 

Monday, 9 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाडयात दिनांक 10 व 11 जानेवारी रोजी किमान तापमानात 2 अं.से. ने घट होऊन दिनांक 12 व 13 जानेवारी रोजी किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये  पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाडयात दिनांक 10 व 11 जानेवारी रोजी किमान तापमानात 2 अं.से. ने घट होऊन दिनांक 12 व 13 जानेवारी रोजी किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 13 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीती ओलावा वाढलेला आहे. 

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रब्बी पिकास, फळबागेस, भाजीपाला पिकास, फुलपि कास, रोपवाटीकेलस रात्री हलके पाणी द्यावे जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीचा परिणाम हरभरा, करडई व गहू पिकास होऊ नये म्हणून रात्री हलके पाणी द्यावे. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 200 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी). केळी बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.  किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे, जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.  द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे.

भाजीपाला

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे भाजीपाला पिकास रात्री सिंचन करावे. भाजीपाला पिकात 2 टक्के 13:00:45 ची फवारणी करावी. रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेंडाझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे फुल पिकास रात्री सिंचन करावे.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे (तापमान 6 ते 8 अं.से. पर्यंत खाली आल्यामूळे) मुख्यता करडे, कोंबडीची पिल्ले व एकुणच लहान जनावरांच्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो. गारठणे (चिलींग) किंवा कधी कधी बर्फाचे चावणे (फ्रॉस्ट बाईट) ई. समस्या उदभवतात. गारठण्ध्यामूळे पुढे घातक न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाट) तर बर्फाच्या चावण्यामुळे पुढे गँग्रीन सारख्या समस्या उदभवू शकतात (मुख्यता बर्फाळ प्रदेशामध्ये). मुख्यता कोंबड्यांमध्ये थंडीमूळे कोरायझा हा आजार उदभवतो, तरकरडांमध्ये देखील मरतुक वाढण्याची भिती वाढते. आपल्या जनावरांना अधिक उब कशी मिळेल ते पहा जसेकी पोत्यांचे पडदे लावून गोठ्यामध्ये उब निर्माण करणे मोठा बल्ब लावणे, गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, दिवसा पडदे  काढून उन्हामूळे मिळणारी उष्णता निर्माण करणे, पाण्यामधून रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी जसे की ई-केअर सी, ईम्यूनोलाईट पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देण, शक्यतो उष्ण पाणी (बोरचे ताजे पाणी) देणे.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सौजन्य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 82/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 10.01.2023

 

 

Friday, 6 January 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 81/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 06.01.2023


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. ‍

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. ‍

किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकास, फळबागेस, भाजीपाला पिकास हलके पाणी द्यावे.

मराठवाडयात दिनांक 06 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 13 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे. 

उपग्रहाच्या छाया चित्रानुसार मागील काही दिवसापासून ‍किड व रोगाचा प्रादूर्भाव वाढल्यामूळे सामान्य वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) कमी झालेला दिसून येत आहे या करीता शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे किड व रोगापासून संरक्षण करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 200 ग्रॅम 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवडे झाले असल्यास 260 किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. सध्याच्या ढगाळ व  धुक्याच्या वातावरणामूळे ऊस पिकावरील लोकरी मावा याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20% ईसी 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता संत्रा/मोसंबी बागेस हलके पाणी द्यावे. अंबे बहार धरण्यासाठी मोसंबी बागेस 500:500:500 ग्रॅम व संत्रा बागेस 400:400:400 ग्रॅम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी व बागेस पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.  डाळींब बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी प्रति झाड 300:250:250 ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश खतमात्रा देऊन बागेस पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या मृग बहार डाळींब फळांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी. किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता डाळींब बागेस हलके पाणी द्यावे. किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता द्राक्ष बागेत पाणी व्यवस्थापन करावे जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.  द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत. किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता केळी बागेत घड निसवले असल्यास घडांना सर्क्टींग करून घ्यावी.

भाजीपाला

किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकास हलके पाणी द्यावे.भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. सध्याच्या ढगाळ व  धुक्याच्या वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) 40 मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ व  धुक्याच्या वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास हलके पाणी द्यावे. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

किमान तापमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 81/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 06.01.2023

 

Monday, 2 January 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंत किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये  पुढील 3 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंत किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 06 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उशीरा पेरणी केलेल्या भुईमूग पिकात मावा, फुलकिडे याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास पोटरी येण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे. गहू पिकास फुटवे फुटण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत. मृग बाग धरलेल्या केळी बागेत घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत झाडांना काठीचा आधार द्यावा. आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारण करू नये. सध्या कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे द्राक्ष बागेत पाणी व्यवस्थापन करावे जेणेकरून बागेत मणी तडकण्याची समस्या उद्भवणार नाही.  द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड वर्तमान पत्राच्या साहाय्याने झाकून घ्यावेत.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट 2022 पासून चालू आहे व त्याची तिव्रता लसीकरणामूळे कमी झाली असली तरीही आजही  नवीन नवीन पशु व वासरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी (1) राहीलेल्या पशुधनास तात्काळ लसीकरण करणे. (2) महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या “माझा गोठा-स्वच्छ गोठा” याची माझ्या गोठ्यामध्ये अमलबजावणी व दैनंदिन स्वच्छता आमलात आणणे. (3) गोचीडाचा प्रादुर्भाव रोखणे. गोचीड या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. (4) लागण झालेल्या पशुचे विलगीकरण-आजारी पशुस ईतर पशुपासून दुर विलगीकरणामध्ये ठेवणे. (5) रोगी पशु असलेला गोठा सोडीयम हायपोक्लोराईट ने निर्जंतुकीकरण करणे हे उपाय सलग चालू ठेवावेत.

सामूदायीक विज्ञान

लोह समृध्द पदार्थ-कुटुंबाच्या दैनंदिन आहारात बदल करून लोहाच्या कमतरतेमूळे उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून विविध पाककृती मदत करतात. आपल्याकडे अनेक हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्या खनिज समृध्द असून या भाज्यांची  विविध पाककृतीमध्ये उपयोग करावा. ताज्या भाज्यांच्या तुलनेत सुकवलेल्या भाज्यांच्या पावडर मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वापरातील पालक, कोथिंबीर, शेवग्याची पाने आणि कढीपत्याची पाने सुकवून त्याची पावडर बनवून लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी विविध पाककृतीमध्ये वापरावी.

सौजन्य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 80/ 2022 - 2023    मंगळवार, दिनांक – 03.01.2023