Friday, 14 July 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 जुलै औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 16 जुलै रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 व 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 18, 19 व 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 जुलै औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 16 जुलै रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 14 व 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 18, 19 व 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 14 ते 20 जूलै 2023 दरम्यान व दिनांक 21 ते 27 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 ते 25 जूलै 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.

मराठवाडयात मागील 12 दिवसात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : गंगाखेड, सेलू ; जालना जिल्हा : बदनापूर, मंठा ; हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ,हिंगोली, कळमनूरी, सेनगाव ; उस्मानाबाद जिल्हा : लोहरा, परांडा, उमरगा ; औरंगाबाद जिल्हा : कन्नड, पैठण, फुलंब्री ; बीड जिल्हा : धारूर, केज, परळी वैजनाथ, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या सोयाबीन पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या खरीप ज्वारी पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जुलैच्या पहिल्या आठवडयानंतर खरीप ज्वारी हे पिक घेऊ नये. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या बाजरी पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी नविन संत्रा/मोसंबी बागेची लागवड करावी. नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन डाळींब बागेची लागवड लागवड करावी. नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड लागवड करावी. नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका चारा पिकाची पेरणी करावी. मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम उत्पादक किंवा रेशीम उद्योजकाकडे गाय, म्हैस, शेळी व मेंढी हे पशुधन असणे आवश्यक आहे. तुती रेशीम किटकांसाठी उत्तम खाद्य असून तुती पानांत 26 ते 36 टक्के पर्यंत प्रथीनांचे प्रमाण असते त्यामुळे भाकड किंवा दुधाळ पशुधन असले तरी त्यास उत्तम खाद्य म्हणून तुती पानांचा वापर करता येतो. त्यामूळे 34 टक्के जास्त दुधात वाढ होते. फॅट टक्केवारी 4% जास्त मिळते व दुधाला चांगला भाव मिळतो. त्याचबरोबर सिल्क आणि मिल्क उत्पादन करायची संधी उपलब्ध होते. रेशीम मुळे हातात पैसा येतो व दुधामुळे आरोग्य सुधारते. खेड्याचे अर्थकारण बळकटी मिळण्यास मदत मिळते. त्याचबरोबर तुतीपाने उत्पादनासाठी जमिनीत टाकण्यासाठी शेणखत उपलब्ध होतो.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 30/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 14.07.2023

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

Tuesday, 11 July 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 29/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 11.07.2023


 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 12 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 11 व 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 13 व 14 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 15, 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 12 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 11 व 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 13 व 14 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 15, 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 जूलै 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे. 

मराठवाडयात मागील 12 दिवसात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : गंगाखेड, सेलू ; नांदेड जिल्हा : धर्माबाद ; लातूर जिल्हा : अहमदपूर ; जालना जिल्हा : बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा ; हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ,हिंगोली, कळमनूरी, सेनगाव ; उस्मानाबाद जिल्हा : लोहरा, परांडा, उमरगा ; औरंगाबाद जिल्हा : कन्नड, पैठण, फुलंब्री ; बीड जिल्हा : धारूर, केज, परळी वैजनाथ, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची पेरणी करता येते. 8 जूलै नंतर भुईमूग, मुग, उडीद हि पिके घेऊ नये.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई करू नये, पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते.  पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तूर व मका पेरणीची घाई करू नये, पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच तूर व मका पिकाची पेरणी करावी.  तुर पिकाची पेरणी 15 जूलै पर्यंत करता येते. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. 08 जूलै नंतर मूग/उडीद व भुईमूक ही पिके घेऊ नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा, सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नवीन केळी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेस 50 ग्रॅम नत्र व 200 ग्रॅम स्फुरद प्रति  झाड खतामात्रा द्यावी. आंबा फळ बागेस 10 ते 15 वर्ष वयाच्या झाडास 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश खतमात्रा द्यावी, तसेच प्रति झाड 50 किलो शेणखत टाकावे. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी.

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. 

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 29/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 11.07.2023

 

 


Friday, 7 July 2023

मराठवाडयात दिनांक 07 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 07 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 08 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 09 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 10 व 11 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 07 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 07 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 08 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 09 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 10 व 11 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 12 ते 18 जूलै 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

पेरणीयोग्य (75 ते 100 मिमी) पाऊस झालेल्या भागात जमिनीत पुरेसा ओलावा असल्यची खात्री करून बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या भागात शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो ग्रॅम गंधक खताची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते.खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी  जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी जमिनीत 60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते.सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा.हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी नविन संत्रा/मोसंबी बागेची लागवड करावी. नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.पाऊस झालेल्या ठिकाणी नविन डाळींब बागेची लागवड लागवड करावी. नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड लागवड करावी. नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

तुती रेशीम उद्योग

ढगाळ वातावरणात रेशीम कीटक संगोपनाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बाह्य रेशीम कीटक संगोपनगृहात 25 अं.से. तापमान व 65 टक्के सापेक्ष आर्द्रता कात अवस्थेत असणे आवश्यक असते. कातेवर बसताना 5 ग्रॅम प्रति चौ. फुट याप्रमाणे पांढरा कळीचा चूना अळयांवर धुरळणी करावी. 24 तास कात अवस्थेत तुतीपाने खाद्य देऊ नये. त्यामूळे कात ओळखता येणे महत्वाचे आहे. काते वरून उठताना खाद्य देण्याअगोदर अर्धातास निर्जंतूक विजेता किंवा अंकुश पावडर अळ्यांवर सचिद्र पातळ सुती कपडयाने धुरळणी करावी. 100 अंडीपूजास 15 कि.ग्रॅ. चुना व 4.5 कि.ग्रॅ. विजेता पावडर लागते.

पशुधन व्यवस्थापन

पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 28/ 2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 07.07.2023

Tuesday, 4 July 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 27/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 04.07.2023


 

दिनांक 04 जूलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 05 जुलै रोजी हिंगोली, परभणी, लातूर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जुलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 05 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 06 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 07 व 08 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 04 जूलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 05 जुलै रोजी हिंगोली, परभणी, लातूर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जुलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 04 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 05 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 06 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 07 व 08 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 जूलै 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे. 

सध्या पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू बिटी कापूस पिकास 120:60:60 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 48 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. बागायती बिटी कापूस पिकास 150:75:75 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. तूर पिकास 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग/उडीद पिकास पेरणीच्यावेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद हेक्टरी मात्राद्यावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग पिकास 20 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकास 150:75:75 किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतमात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा, सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

 

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 27/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 04.07.2023