Tuesday, 22 July 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 जूलै रोजी बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 26 जूलै रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 व 25 जूलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी जालना, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर जिल्हयात तर दिनांक 26 जुलै रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 23, 25 व 26 जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 24 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 जूलै रोजी बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 26 जूलै रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 व 25 जूलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी जालना, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर जिल्हयात तर दिनांक 26 जुलै रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 23, 25 व 26 जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 24 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 ते 4 अं.सें. ने घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक  25 ते 31 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.

संदेश : पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने  ही पिके घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

जमिनीत वापसा असतांना कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 35 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 52 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा असतांना द्यावी. कापूस पिकाची लागवड करून 45 दिवस झाले असल्या 200 ग्रॅम यूरिया प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तूर पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत वापसा असतांना तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तूर पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. मूग/उडीउ पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जमिनीत वापसा असतांना मुग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.  मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.  भूईमूग पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत वापसा असतांना भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.  मका पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत वापसा असतांना मका पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. मका पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. मका पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 75 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा असतांना द्यावी. ऊस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. उस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. केळी बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेस 50 ग्रॅम यूरिया प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. सिताफळ बागेत मर व बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जमिनीत वापसा असतांना सिताफळ बागेत तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुलपिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 33/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 22.07.2025

 

 


Friday, 18 July 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 जूलै रोजी परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 19 जूलै रोजी लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 20 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 जूलै रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 18 व 21 जूलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 19, 20 व 22 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 जूलै रोजी परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 19 जूलै रोजी लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 20 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 जूलै रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 18 व 21 जूलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 19, 20 व 22 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात तर किमान तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 18 ते 24 जुलै, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक  25 ते 31 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग  किंचित कमी झालेला आहे.

संदेश : पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने  ही पिके घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळ्या व घाटेअळी (उंट अळी)चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50%  ईसी 20 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.90 % सीएस 6 मिली किंवा इंडोक्झकार्ब 15.80 % ईसी 7 मिली प्रति 10 लिटर पाणी यापैकी कुठलेही एक किटकनाशक पाऊसाने उघाड दिल्यास फवारावे. सोयाबीन पिक पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास तणांच्या व्यवस्थापनासाठी इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारवे. सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. सोयाबीन पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 मिली  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास उर्वरीत 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. बाजरी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. बाजरी पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास उर्वरीत 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. हळद पिकास 25 किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने महिन्यातून तीन ते चार वेळा द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षत घ्यावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी.‍  डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत. मृग बहार डाळींब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षत घ्यावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. डाळींब बागेत 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

चिन देशाच्या तुलनेत भारतात वर्षाकाठी रेशीम कोषाची सरासरी निम्मी पिके म्हणजे 4-5 पिके घेतली जातात याउलट चिन देशात वर्षाला कोषाची 10 ते 12 पिके घेतली जातात. प्रती एकर प्रती पिक चिन देशात 250 ते 300 अंडीपूजाचे एक पीक तर भारतात 1550 ते 200 अंडीपूज सरासरी घेतले जातात. जागतीक कच्च्या रेशीम उत्पादनात सातत्याने चिन देश प्रथम क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेशीम उद्योगात भारत देशात 8.9 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर चिन देशात फक्त 1 दशलक्ष लोक हे रेशीम उद्योगाचे कार्य करत आहेत. चिन देशाच्या तुलनेत आपल्या शेतकऱ्यांनी तुती पानाची प्रत आणि रेशीम किटक संगोपन तंत्रज्ञान सुधारणा करणे गरजेचे आहे तरच जागतीक स्पर्धेत राहता येईल.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक – 18.07.2025

 


Tuesday, 15 July 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 जूलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 जूलै रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 15, 16 व 18 जुलै रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 जूलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात  तर दिनांक 18 जूलै रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 15, 16 व 18 जुलै रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.सें. ने वाढ होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक  18 ते 24 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने,  ही पिके घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस, तूर, मुग/उडीद, भुईमूग व मका पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी.  तूर पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.पेरणी केलेल्या तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तूर पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.  मूग/उडीद पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी केलेल्या मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. मूग/उडीद पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.  भुईमूग पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भुईमूग पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.  मका पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 1 % (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. मका पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.  उस कापूस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेस पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या केळी बागेस 50 ग्रॅम नत्र प्रति  झाड खतामात्रा द्यावी. केळी बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.आंबा फळ बागेत 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. द्राक्ष बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. सिताफळ बागेत तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 31/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 15.07.2025

 

Friday, 11 July 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जुलै रोजी जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 12 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 13 ते 15 जूलै दरम्यान आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जुलै रोजी जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 12 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 13 ते 15 जूलै दरम्यान आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात पुढील चार ते पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 11 ते 17 जुलै, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक  18 ते 24 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

संदेश : पेरणी न झालेल्या भागात शेतकऱी बांधवांनी पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग व खरीप ज्वारी सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सोयाबीन पिकात खोड माशी व उंट अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50%  400 मिली किंवा इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पाऊसाने उघाड दिल्यास फवारावे. सोयाबीन पिक पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास तणांच्या व्यवस्थापनासाठी इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारवे. सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. उस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षत घ्यावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी.‍ मृग बहार डाळींब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षत घ्यावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

चिन देशाच्या तुलनेत भारतात वर्षाकाठी रेशीम कोषाची सरासरी निम्मी पिके म्हणजे 4-5 पिके घेतली जातात याउलट चिन देशात वर्षाला कोषाची 10 ते 12 पिके घेतली जातात. प्रती एकर प्रती पिक चिन देशात 250 ते 300 अंडीपूजाचे एक पीक तर भारतात 1550 ते 200 अंडीपूज सरासरी घेतले जातात. जागतीक कच्च्या रेशीम उत्पादनात सातत्याने चिन देश प्रथम क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेशीम उद्योगात भारत देशात 8.9 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर चिन देशात फक्त 1 दशलक्ष लोक हे रेशीम उद्योगाचे कार्य करत आहेत. चिन देशाच्या तुलनेत आपल्या शेतकऱ्यांनी तुती पानाची प्रत आणि रेशीम किटक संगोपन तंत्रज्ञान सुधारणा करणे गरजेचे आहे तरच जागतीक स्पर्धेत राहता येईल.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे. पावसाळ्यामध्ये ‍जनावरांना खाद्यातून ताजा, हिरवा, कोवळा चारा विशेष शेळींना जास्त प्रमाणात देणे टाळावे, कोवळा चाऱ्यास एक तरी उन्हाचा चटका/उन दाखवूनच आहारात देणे गरजेचे आहे. ज्यामूळे अंग विषार, हगवण या आजारांना शेळी, इतर जनावरे बळी पडणार नाहीत.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 30/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक – 11.07.2025