Friday, 10 February 2023
Thursday, 9 February 2023
मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. विशेषत: औरंगाबाद व जालना जिल्हयात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. विशेषत: औरंगाबाद व जालना जिल्हयात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरी
ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 17 ते 23
फेब्रूवारी 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे
तर जमिनीती ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 15 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास आवश्यकतेनूसार
तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे
लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा
पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी
अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन
बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे करडई
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली
किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. काढणीस तयार
असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली
प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड 15
फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या
बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम कार्बेन्डेझीम
(बाविस्टीन) किंवा 2.5 ग्रॅम थायरम किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया
करावी. नंतर ॲझॅटोफॉस 20 मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे मृग बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन
(10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक
नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2
ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. अंबे बहार
धरण्यासाठी शेतकऱ्यांनी ताण तोडला नसल्यास बागेस हलके पाणी देऊन ताण तोडावा व
शिफारसीत खतमात्रा द्यावी. डाळींब बागेत
अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे)
शिफारसीत खतमात्रा द्यावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. सध्या
आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून येत आहे. याच्या
व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या
वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या
व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा
सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
पुढील आठवड्यात असलेल्या
व्हॅलेंटाइन्स डेमुळे बाजार पेठेत गुलाब
फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार
पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे फुल
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
तुती रेशीम उद्योग
तुती पाने उत्पादन वाढीसाठी व
प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात
मिसळून छाटए नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20
टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत
बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.
सामुदायिक विज्ञान
बाळाला वयाच्या 6 महिन्यानंतरही मानेवर
ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून
हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक
असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू
शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू
करावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 91/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
10.02.2023
Tuesday, 7 February 2023
Monday, 6 February 2023
मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसात कमल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसात कमल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 फेब्रूवारी 2023
दरम्यान
कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी
भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5
टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी
करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.मागील
पाच दिवसात किमान तापमानात झालेल्या
घटीमुळे उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी
कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे
भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या
अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना
कराव्यात. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी
करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर लागवड
केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफुल पिकाची काढणी करून घ्यावी.गहू
पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे
भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी
द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.गव्हाच्या पिकात
उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग
गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद
करावीत.उन्हाळी भुईमूग पिकात पेरणी पूर्वी पुढील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. i. थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे. ii. प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. प्रतयेकी 250 ग्राम
किंवा द्रव स्वरूपात असेल तर प्रतयेकी 60 मिली.
फळबागेचे
व्यवस्थापन
मृग बाग जून लागवड केळी बागेत बोधांना
माती लावावी व आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व केळी बागेस आधार द्यावा. आंबा बागेत फळगळ होऊ
नये म्हणून 00:52:34 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला
पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या
व्यवस्थापनासाठी ब्रोफ्लॅनिलीड 1.25 ग्रॅम किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल 18 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ
पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे
गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20%
एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
पुढील आठवड्यात असलेल्या
व्हॅलेंटाइन्स डेमुळे बाजार पेठेत गुलाब
फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार
पेठेत पाठवावी फुल पिकास आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
मागील पाच दिवसात किमान तापमानात
झालेल्या घटीमूळे मुख्यता करडे, कोंबडीची पिल्ले व एकुणच लहान जनावरांच्या
प्रकृतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो. थंडीमुळे पुढे न्यूमोनिया (फुफ्फुसाचा
दाह) सारख्या समस्या उदभवू शकतात. मुख्यता कोंबड्यांमध्ये थंडीमूळे कोरायझा हा
आजार उदभवतो, तर करडांमध्ये देखील मरतुक वाढण्याची भिती
वाढते. आपल्या जनावरांना अधिक उब कशी मिळेल ते पहा जसेकी पोत्यांचे पडदे लावून
गोठ्यामध्ये उब निर्माण करणे मोठा बल्ब लावणे, गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही याची
काळजी घेणे, दिवसा पडदे काढून उन्हामूळे
मिळणारी उष्णता निर्माण करणे, पाण्यामधून रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी जसे की
ई-केअर सी, ईम्यूनोलाईट पशुवैद्यकाच्या सल्ल्याने देण, शक्यतो उष्ण पाणी (बोरचे
ताजे पाणी) देणे.
सामुदायिक विज्ञान
मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत
झपाट्याने होत असतो. या काळात बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक चालना देणारे
वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 90/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
07.02.2023
Friday, 3 February 2023
Thursday, 2 February 2023
मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने
वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल
व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे तर दिनांक
10 ते 16 फेब्रूवारी 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला
आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास
आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची
काळजी घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20
पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई)
निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकाच्या काढणीस साधारणत:
फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5%
4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस
पिकाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी 30 X
10 सें.मी. किंवा 45 X 7.5 सें.मी. अंतरावर 3
ते 4 सें.मी. खोलीवर करावी. बी जास्त खोल पेरल्यास उगवण कमी होते. पेरणीसाठी
हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेस
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन
(10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक
नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2
ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. अंबे बहार
धरण्यासाठी शेतकऱ्यांनी ताण तोडला नसल्यास बागेस हलके पाणी देऊन ताण तोडावा व
शिफारसीत खतमात्रा द्यावी. डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी. काढणीस
तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ
पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे
गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20%
एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या
व्यवस्थापनासाठी ब्रोफ्लॅनिलीड 1.25 ग्रॅम किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल 18 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. फुल
पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची
काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
तुती बागेत केसाळ अळी (बिहार हेअरी
केंटर पिलर) याचा प्रादुर्भाव हिवाळयात जाणवतो. पानांवर पुंजक्यात 200 ते 300 अळया
अंडयातुन फुटून बाहेर येतात व पानांवर उपजिवीका करतात यामुळे पानांची चळणी झालेली
दिसते. याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशक न फवारता भौतीक पध्दतीने म्हणजे हाताने
प्रादुर्भावग्रस्त पाने तोडावेत व अळया रॉकेलमध्ये बुडवून नियंत्रण करावे.
सामुदायिक विज्ञान
मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ
वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाट्याने होत असतो. तेव्हा या काळात
बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक
कुटुंबाची जबाबदारी आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 89/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
03.02.2023
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशि...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...



