Friday, 13 September 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त, किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता सभागृह कृषि महाविद्यालय परभणी रब्बी पीक परिसंवाद 2024 आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्रॅम  किंवा टेब्यूकोनॅझोल 25.9% 12.5 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 15.8% 140 मिली किंवा असिटामाप्रीड 25% + बाईफेंन्थ्रीन 25% 100  ग्रॅम किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली किंवा आयसोसायक्लोसिरम 9.2% 240 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे.  कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा डायफेनथ्युरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.  खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी व फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. काकडीवर्गीय पिकात डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅर्न्कोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

पशुधन व्यवस्थापन

पशुधनास बाह्य परजीवी पासून रक्षण करण्यासाठी जनावरांना खरारा करावा, यामूळे शरीरावरील बाह्य परजिवी गळून पडतात त्वचा चमकदार दिसते. गोठयाच्या कानाकोपऱ्यात शिफारसीत गोचीड नाशकाची फवारणी करावी. फवारणी करत असतांना जनावरे गोठयात नसावीत.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांना पावसाळा व हिवाळ्यात उद्भवणारा तट्टे किंवा खडू रोगाचा प्रादूर्भाव जाणवतो. ढगाळ वातावरणात पाऊस चालू असेत लर संगोपनगृहातील आर्द्रता 85 टक्केच्या वर म्हणजे 95 ते 100 टक्के असते. अशावेळी लोखंडी रॅक गंजतात नायलॉन दोरीचे रॅक सुरक्षित राहतात. निर्जंतूकीकरण फॉरमॅलीनच्या साहाय्याने करू नये. फॉरमॅलीन मूळे लोखंड गंज पकडते. प्रत्ये कातीच्या वेळी पांढरा चुना धुरळणी करावी. संगोपनगृहात अशा वेळी 0.3 टक्के पांढरा चुना व 2 टक्के ब्लिचींग पावडर द्रावणाचा ‍ छिडकाव करावा. धुळ उडणार नाही याची काळजी घ्यावी. निर्जंतुकिकरण साठी लोखंडी रॅक असतील तर फ्लेम गनचा वापर करावा, म्हणजे वेळेची बचत होईल व 100 टक्के निर्जंतुकिकरण होईल.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 48/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक – 13.09.2024

Tuesday, 10 September 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहून, दिनांक 10 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर व बीड जिल्हयात तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसानंतर कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

शेतकरी बांधवांनी फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा डायफेनथ्युरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. कापूस पिकात बाह्य बोंडसड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब 70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तूर पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. काढणीस तयार असलेल्या मूग/उडीद पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेस 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत बोधांना माती लावावी. केळी बागेतील अतिरिक्त पिलं काढून टाकावेत. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. आंबा फळ बागेत  किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व मँगो मॉलफॉरमेशन रोग होऊ नये म्हणून बागेत किटक नाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. द्राक्ष बागेत खताची मात्रा दिली नसल्यास देण्यात यावी. द्राक्ष बागेत पूर्व छाटणीची तयारी करावी. सिताफळ बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकाची लागवड करून 15 ते 20‍ दिवस झाले असल्यास जमिनीत ओलावा बघून खमतात्रा देण्यात यावी. भेंडी पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

गणपती व गौरी उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 47/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 10.09.2024

Friday, 6 September 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आकाश अंशत: ढगाळ राहून दिनांक 06 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 06 ते 12 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा व 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

मागील आठवडयात सतत झालेल्या पावसामूळे पिकात / बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा व फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन, कापूस, खरीप ज्वारी, ऊस व हळद पिकात पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 15.8% 140 मिली किंवा असिटामाप्रीड 25% + बाईफेंन्थ्रीन 25% 100  ग्रॅम किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली किंवा आयसोसायक्लोसिरम 9.2% 240 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे.  सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्रॅम  किंवा टेब्यूकोनॅझोल 25.9% 12.5 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  कापूस पिकात आकस्मिक मर किंवा मूळकूज प्रादूर्भाव दिसू लागल्यास 200 ग्रॅम यूरिया +100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50) + 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी. द्रावणाची आळवणी केल्यानंरत सूकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने दाबून घ्यावी.  खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास  एनएए 15 पीपीएम ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात  मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. काकडीवर्गीय पिकात डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅर्न्कोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात पाणी साचले असल्यास साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. गणपती व गौरी उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांच्या गोठ्यात वाढलेली आर्द्रता गोचिडासह विविध किटकाच्या वाढ व विकासासाठी पोषक असते, त्या किटकांचे जीवनक्रम थांबवण्यासाठी व त्यापासून प्रसारीत होणाऱ्या रोगप्रतिबंधतेसाठी गोठ्यातील भेगा व फटीतील अंडी व इतर अर्भकावस्था गोठ्यातून काढून टाकाव्यात. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांना उच्च प्रतीचा तुती पाने खाद्य देणे गरजेचे आहे. पानात प्रथीने 23 टक्के शर्करी 13 टक्के व कार्बोदके 10 टक्के प्रमाण असणे आवश्यक आहे. बाल्य रेशीम किटकांना 100 अंडीपूजास पहिले आठ दिवस एकूण फक्त 22 कि.ग्रॅ. कोवळी तुती पाने खाद्य द्यावे लागते. नंतरच्या वाढिच्या तिन अवस्थेत कोवळ्या तुती पानांएवजी फांद्या खाद्य दिले तरी चालते. पानाच्या दुप्पट म्हणजे 100 अंडीपूजास 1.5 टनापर्यंत फांद्या खाद्य लागते. पावसात  भिजलेली औली तुती पाने-फांद्या खाद्य चालते. त्यात धूळ किंवा चिखल व घाण येता कामा नये. संगोपन गृहात 85 टक्केच्यावर आर्द्रता असेल तर फांद्या खाद्य देण्या अगोदर पांढरा चुना (केमिकल विरहीत) 100 अंडीपूजास 15 कि.ग्रॅ. प्रमाणात धुरळणी करून पुन्हा फांद्या खाद्य द्यावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 46/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक – 06.09.2024

Tuesday, 3 September 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दिनांक 03 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 ते 07 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 06 ते 12 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे पिकात/बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते लवकरात लवकर शेता बाहेर/बागे बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे कापूस, तूर, काढणी न केलेल्या मुग/उडीद व मका पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांच्या गोठ्यात वाढलेली आर्द्रता गोचिडासह विविध किटकाच्या वाढ व विकासासाठी पोषक असते, त्या किटकांचे जीवनक्रम थांबवण्यासाठी व त्यापासून प्रसारीत होणाऱ्या रोगप्रतिबंधतेसाठी गोठ्यातील भेगा व फटीतील अंडी व इतर अर्भकावस्था गोठ्यातून काढून टाकाव्यात. 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 45/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 03.09.2024

Friday, 30 August 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 30 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा वगळता व दिनांक 31 ऑगस्ट रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 03 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 सप्टेंबर रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 02 सप्टेंबर रोजी लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 03 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 30 ऑगस्ट 05 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व 06 ते 12 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज पाहता काढणी केलेल्या मूग/उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एकरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची कोणत्याही प्रकारचे तणनाशक न मिसळता पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे. सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकात अतिरिक्त पाणी साचणे, कमी तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमूळे ऊस पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळद पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास  एनएए 15 पीपीएम ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत. डाळींब बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. चिकू बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. काकडीवर्गीय पिकात डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅर्न्कोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भेंडी पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

चारा पिके

बहुवार्षिक चारा पिकाची पहिली कापणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी करावी.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांच्या गोठ्यात वाढलेली आर्द्रता गोचिडासह विविध किटकाच्या वाढ व विकासासाठी पोषक असते, त्या किटकांचे जीवनक्रम थांबवण्यासाठी व त्यापासून प्रसारीत होणाऱ्या रोगप्रतिबंधतेसाठी गोठ्यातील भेगा व फटीतील अंडी व इतर अर्भकावस्था गोठ्यातून काढून टाकाव्यात. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकांना उच्च प्रतीचा तुती पाने खाद्य देणे गरजेचे आहे. पानात प्रथीने 23 टक्के शर्करी 13 टक्के व कार्बोदके 10 टक्के प्रमाण असणे आवश्यक आहे. बाल्य रेशीम किटकांना 100 अंडीपूजास पहिले आठ दिवस एकूण फक्त 22 कि.ग्रॅ. कोवळी तुती पाने खाद्य द्यावे लागते. नंतरच्या वाढिच्या तिन अवस्थेत कोवळ्या तुती पानांएवजी फांद्या खाद्य दिले तरी चालते. पानाच्या दुप्पट म्हणजे 100 अंडीपूजास 1.5 टनापर्यंत फांद्या खाद्य लागते. पावसात  भिजलेली औली तुती पाने-फांद्या खाद्य चालते. त्यात धूळ किंवा चिखल व घाण येता कामा नये. संगोपन गृहात 85 टक्केच्यावर आर्द्रता असेल तर फांद्या खाद्य देण्या अगोदर पांढरा चुना (केमिकल विरहीत) 100 अंडीपूजास 15 कि.ग्रॅ. प्रमाणात धुरळणी करून पुन्हा फांद्या खाद्य द्यावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 44/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक – 30.08.2024