Tuesday, 3 September 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दिनांक 03 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 ते 07 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दिनांक 03 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 ते 07 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 06 ते 12 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे पिकात/बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते लवकरात लवकर शेता बाहेर/बागे बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे कापूस, तूर, काढणी न केलेल्या मुग/उडीद व मका पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामूळे फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांच्या गोठ्यात वाढलेली आर्द्रता गोचिडासह विविध किटकाच्या वाढ व विकासासाठी पोषक असते, त्या किटकांचे जीवनक्रम थांबवण्यासाठी व त्यापासून प्रसारीत होणाऱ्या रोगप्रतिबंधतेसाठी गोठ्यातील भेगा व फटीतील अंडी व इतर अर्भकावस्था गोठ्यातून काढून टाकाव्यात. 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 45/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 03.09.2024

 

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 व 15 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...