Friday, 29 October 2021
दिनांक 02 ते 07 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयातील नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात
दिनांक 02 नोव्हेंबर रोजी तर दिनांक 02 ते 07 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी
अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 नोव्हेंबर ते 09 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बागायती हरभरा पिकाची पेरणी
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. बागायती हरभरा पेरणी करतांना 25
किलो नत्र 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टर द्यावे. हरभरा पिकास जस्त
व गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते, म्हणून 20 किलो झिंक सल्फेट व 20 किलो
गंधक प्रति हेक्टर द्यावे.गहू पिकाच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी सुपीक जमिन
निवडावी. खोल नांगरट व वखराच्या दोन ते तीन पाळया देऊन काडी कचरा वेचून घ्यावा.पूर्व
हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. ऊस पिकाच्या लागवडीसाठी
को-86032, को-94012, को-0265, कोव्हीएसआय-03102, कोव्हीएसआय-1805 व को-92005 या
भरपूर फुटवे देणाऱ्या जातींची निवड करावी.हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी
अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली +
5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा
प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15
दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ होऊ नये म्हणून तसेच फळाचा
आकार वाढण्यासाठी जिब्रॅलिक ॲसिड 50 मिली ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.डाळींब बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी 00:00:50 20 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.नविन लागवड केलेल्या चिकू बागेत जमिनीत वापसा येताच
अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.
भाजीपाला
पुर्नलागवडीस तयार असलेल्या रब्बी
भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करून घ्यावी व पुर्नलागवड केल्यानंतर पिकास हलके पाणी
द्यावे.
फुलशेती
पुढील काळात दीपावली सणामुळे
बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते त्यामूळे आवश्यकतेनूसार फुलांच्या तोडणीचे
नियोजन करावे.
चारा पिके
रब्बी हंगामात ज्वारी, ओट, बरसीम, लसूण
घास इत्यादी चारा पिकांची लागवड करावी.
तुती रेशीम उद्योग
यशस्वी कोष उत्पादनासाठी तुती पाने
उत्पादनाचा मोठा 38% वाटा असून संगोपन गृहातील हवामान म्हणजे तापमान 22 ते 28 अंश सेल्सियस व
आर्द्रता 80 ते 85% असणे आवश्यक आहे. दूसऱ्या व तिसऱ्या
वर्षात 5X3X2 फुट अंतरावर किंवा 6X2X2 फुट
केलेल्या लागवडीत तुट राहणार नाही याची काळजी घ्यावी. तुटीमध्ये तुतीचे बेणे लागवड
करणे यशस्वी राहत नाही. म्हणून तुट भरून काढण्यासाठी लहान तुती रोपे लावावीत. तुती
रेशीम किटकाचे आवडते खाद्य म्हणजे तुती होय. म्हणून तुती पानावर भुरी रोग (पांढरे
डाग) आल्यास बूरशीनाशक कार्बेन्डेझीम 0.2% म्हणजे 20 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 5 ते 6 दिवसांनी किटकास पाने खाद्य
म्हणून द्यावे.
सामुदायिक विज्ञान
दूधामधील कॅल्शियम हाडांसाठी तर
प्रथिने हे स्नायूंच्या बळकटी करणाकरिता आवश्यक आहे. सकाळी दुध घेतल्यानंतर दिवसभर
ताजे वाटते. दुधामध्ये झींक आणि विटामीन डी असल्यामूळे दुधास रोग प्रतिकार शक्ती
वाढवीणारे अन्न असे समजले जाते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 61/2021
- 2022 शुक्रवार, दिनांक - 29.10.2021
Tuesday, 26 October 2021
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवसात किमान तापमान 15.0 ते 19.0 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे
प्रादेशिक
हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात
पूढील पाच दिवसात किमान तापमान 15.0 ते 19.0 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस
पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून
साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50%
400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन
4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून
फवारणी करावी. कापूस पिकात दहीया रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2%
+ डायफेनकोनॅझोल 11.4% एस सी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम –मिथाइल 44.3% एस सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकात
अंतरीक बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसेच
बाह्य बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी
25 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी
5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर
पर्यंत करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. बागायती रब्बी
ज्वारीची पेरणी करतांना 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति
हेक्टरी द्यावे.बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते.
पेरणीसाठी हेक्टरी 10-12 किलो बियाणे वापरावे. बागायती करडई पेरणीसाठी 60 किलो
नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन लागवड केलेल्या केळी बागेत अंतरमशागतीची कामे
करून तणव्यवस्थापन करावे व प्रति झाड 50
ग्रॅम नत्र खत मात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम
50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून स्टीकरसह फवारणी करावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत अंतरमशागतीची
कामे करून तणव्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी केली नसल्यास छाटणी
करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व
बाजारपेठेत पाठवावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास
निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून
बाजारपेठेत पाठवावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
रब्बी हंगामात भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपे तयार केली असल्यास
रोपांना आवश्यकतेनूसार झाऱ्याने पाणी द्यावे.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने
करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुलपिकात आंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे.
पशुधन व्यवस्थापन
पशूधनात बाह्य परजीवी (ऊवा, पिसवा, गोचीड व चावणाऱ्या
कीटकवर्गीय माशा) यांच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक (कडूनिंब तेल 15 मिली + कारंज तेल 15
मिली + 2 ग्रॅम मऊ साबण + 1 लिटर पाणी) हे द्रावण आठवडयाच्या अंतराने पशुधनावर,
गोठ्यामध्ये सभोवताली साचलेल्या पाण्याचे डबके, खच खळगे/नाली व शेणाच्या
ढिगाऱ्यावरती फवारावे. हे वनस्पतीजन्य कीटकनाशक कीटक रोधक व कीटक/गोचीडाचे
जीवनचक्र तोडून त्यांची संख्या घटवण्यासाठी मदत करते.
सामुदायिक विज्ञान
कुटूंबातील जमा-खर्च बचत यांची योजना म्हणजे कौटुंबिक
अंदाजपत्रक होय. अंदाज पत्रकामूळे घर खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 60
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 26.10.2021
Friday, 22 October 2021
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवसात किमान तापमान 17.0 ते 20.0 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे
प्रादेशिक हवामान
केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात
पूढील पाच दिवसात किमान तापमान 17.0 ते 20.0 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
जमिनीत वापसा येताच बागायती हरभरा
पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे करून घ्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. पेरणीपूर्वी बियाण्यास पीएसबी,
रायझोबियम जिवाणू संवर्धनाची आणि ट्रायकोडर्मा व्हीरीडी या जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी.जमिनीत वापसा
येताच गहू पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे करून घ्यावी.पूर्व हंगामी ऊसाची
लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते.हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा
डायमिथोएट 30 % 10 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद
मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम
नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ठिपके
याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा
प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15
दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ होऊ नये म्हणून तसेच फळाचा
आकार वाढण्यासाठी जिब्रॅलिक ॲसिड 50 मिली ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.डाळींब बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी 00:00:50 20 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.नविन लागवड केलेल्या चिकू बागेत जमिनीत वापसा येताच
अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करावे.काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या झेंडू व इतर फुल
पिकांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
चारा पिके
रब्बी हंगामात ज्वारी, ओट, बरसीम, लसूण
घास इत्यादी चारा पिकांची लागवड करावी.
तुती रेशीम उद्योग
तुती छाटणी दूसऱ्या वर्षापासून
प्रत्येक 1.5 महिन्याच्या अंतराने एक कोषाचे पीक या प्रमाणे करावी. 70-80 दिवसात
दोन पीके वर्षात एकूण 7 ते 8 पीके घेता येतात. तुती वृक्ष जमिनीपासून 1.5 फुट (उंच
छाटणी), 30 सें.मी. वरून (मध्यम छाटणी) व 20-25 सें.मी. वरून तळछाटणी अशा तिन
प्रकारे करता येते. दुसऱ्या वर्षापासून एका ठिकाणी एक झाड ठेवावे. बाजूचे फुटवे
काढून टाकावेत म्हणजे मुख्य खोडास परिपक्व पाने येतात. परिपक्व तुती पाने खाद्य
रेशीम कीटकास खाद्य म्हणून दिल्यास कीटकाची दणकट वाढ होते.
सामुदायिक विज्ञान
पैशाचा योग्य वापर होण्यासाठी पैशाचे
नियोजन करून घर खर्चाची नोंद हिशोब वहीत योग्य प्रकारे ठेवल्यास विविध गोष्टींवर
होणाऱ्या खर्चाची तपशीलवार माहिती मिळते व भविष्यातील अनावश्यक गोष्टींवर होणारा
खर्च टाळता येतो.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 59
/ 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक - 22.10.2021
Monday, 18 October 2021
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी,
हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या
बागायती कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात
वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकात सध्या
अंतरीक बोंड सड व बाह्य बोंड सड याचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. अंतरीक बोंड सड
याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम +
स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसेच बाह्य बोंड सड याच्या
व्यवस्थापनासाठी प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 25 ग्रॅम किंवा
प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5
गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी
अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4%
(संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी.तुर
पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा
येताच लवकरात लवकर मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर फवारणी करावी. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी
5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करावी.
बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करता येते.जमिनीत वापसा
येताच पूर्वमशागतीची कामे करून रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. जमिनीत
वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करावी. बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर
पर्यंत करता येते.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन लागवड केलेल्या केळी बागेत जमिनीत वापसा येताच
अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करून
प्रति झाड 50 ग्रॅम नत्र खत मात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी
10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह फवारणी करावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत जमिनीत वापसा येताच
अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.
द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करणऱ्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीचे नियोजन
करावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत
पाठवावी.
भाजीपाला
जमिनीत वापसा येताच भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून
बाजारपेठेत पाठवावी. रब्बी हंगामात भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्यावर
बियाणे टाकून रोपे तयार करावीत.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने
करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्राण करावे.
पशुधन व्यवस्थापन
अतिवृष्टीमूळे गवताद्वारे होणारे कृमीजन्य आजार यांचे
प्रमाण वाढले आहे. तसेच तळयाकाठी व गवतावरून गोगलगायजन्य आजार यांचे प्रमाण वाढते
आहे. म्हणून शेळी-मेंढीमध्ये जंतनाशक औषधीची मात्रा तर करडे, कोकरे, लहान वासरे
यांना रक्ती हगवण या आजारावरील औषधे पशूवैद्यक तज्ञांच्या मार्गदर्शनानूसार
द्यावे. तद्वतच साचलेले पाणी पशूधन पिणार नाही याची काळजी घ्यावी. अशा पाण्याच्या
स्त्रोताभोवती कुंपण करून घ्यावे व शूध्द पाणी पशूधनास द्यावे.
सामुदायिक विज्ञान
कुटूंबातील जमा-खर्च बचत यांची योजना म्हणजे कौटुंबिक
अंदाजपत्रक होय. अंदाज पत्रकामूळे घर खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि
हवामान सल्ला पत्रक क्रमांक
– 58 / 2021 - 2022 सोमवार, दिनांक – 18.10.2021
Thursday, 14 October 2021
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तर दिनांक 17 ऑक्टोबर रोजी हिंगोली, नांदेड, परभणी व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात तर दिनांक 17 ऑक्टोबर रोजी हिंगोली, नांदेड,
परभणी व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30-40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी न केलेल्या व काढणीस तयार
असलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून मळणी करावी. मळणी केलेले सोयाबीन पावसाची उघाड
बघून उन्हात वाळवूनच साठवणूक करावी.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून
कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची
कामे करून कोरडवाहू करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. बागायती करडई पिकाची
पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे करून
कोरडवाहू रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. बागायती रब्बी ज्वारी
पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करता येते.जमिनीत वापसा येताच पूर्वमशागतीची कामे
करून रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी लवकरात लवकर करावी. हळदीच्या पानावरील ठिपके याच्या
व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली +
5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात
कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या
अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
10 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी
बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे. नविन लागवड केलेल्या डाळींब बागेत जमिनीत वापसा
येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे. नविन लागवड केलेल्या चिकू बागेत जमिनीत वापसा
येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.
भाजीपाला
रब्बी हंगामात भाजीपाला पिकांच्या
लागवडीसाठी गादीवाफ्यावर बियाणे टाकून रोपे तयार करावीत.
फुलशेती
दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना
अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी.
चारा पिके
रब्बी हंगामात चारा पिकांच्या
लागवडीसाठी जमिनीत वापसा येताच पूर्व मशागतीची कामे करावी.
तुती रेशीम उद्योग
पावसाळयात पाणथळ जमिनीत किंवा खोल
जमिनीत तुती लागवडीत पाणी साठून राहता कामा नये असे झाल्यास आर्द्रता वाढल्यामूळे
पानावर बुरशिजन्य रोगाचा (भूरी) प्रादूर्भाव होतो व पानाची प्रत खराब होते रेशीम
कीटकास रोग प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्यामूळे पिकात साचलेले अतिरिक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
सामुदायिक विज्ञान
एकापेक्षा जास्त कार्यासाठी वापरले
जाणारे फर्निचर उचलण्यासाठी तसेच एका जागेवरून दूसऱ्या जागी नेण्यास आरामदायक
असावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 57
/ 2021 - 2022 गुरुवार, दिनांक - 14.10.2021
Tuesday, 12 October 2021
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल.
प्रादेशिक
हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील चार ते पाच
दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
रब्बी पिकांच्या लागवडीसाठी जमिनीत
वापसा येताच पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी.वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार
असलेल्या बागायती कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस
साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.
कापूस पिकात सध्या अंतरीक बोंड सड व बाह्य बोंड सड याचा प्रादूर्भाव दिसून येत
आहे. अंतरीक बोंड सड याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम +
स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी तसेच बाह्य बोंड सड याच्या
व्यवस्थापनासाठी प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 25 ग्रॅम किंवा
प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5
गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी
अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4%
(संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी.तुर
पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा
येताच लवकरात लवकर मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर फवारणी करावी. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी
5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीत वापसा येताच काढणीस तयार असलेल्या भूईमूग
पिकाची काढणी करावी.काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन लागवड केलेल्या केळी बागेत जमिनीत
वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करून प्रति झाड 50 ग्रॅम नत्र खत मात्रा द्यावी. केळी
बागेत करपा
(सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम
50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल 10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून स्टीकरसह फवारणी करावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत जमिनीत वापसा
येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करणऱ्या
शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी
करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
जमिनीत वापसा येताच भाजीपाला पिकात
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.
फुलशेती
सध्या नवरात्र व पूढे येणाऱ्या दसरा
उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
अतिवृष्टीमूळे गवताद्वारे होणारे
कृमीजन्य आजार यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच तळयाकाठी व गवतावरून गोगलगायजन्य आजार
यांचे प्रमाण वाढते आहे. म्हणून शेळी-मेंढीमध्ये जंतनाशक औषधीची मात्रा तर करडे,
कोकरे, लहान वासरे यांना रक्ती हगवण या आजारावरील औषधे पशूवैद्यक तज्ञांच्या
मार्गदर्शनानूसार द्यावे. तद्वतच साचलेले पाणी पशूधन पिणार नाही याची काळजी
घ्यावी. अशा पाण्याच्या स्त्रोताभोवती कुंपण करून घ्यावे व शूध्द पाणी पशूधनास
द्यावे.
सामुदासिक विज्ञान
घराच्या आसपास मोठी झाडे किंवा उंच
इमारती नसाव्यात. जेणेकरून घरामध्ये ताजी हवा व सूर्यप्रकाश येण्यास अडथळा निर्माण
होणार नाही.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 56
/ 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 12.10.2021
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...