Thursday 17 March 2022

मराठवाडयात पुढील दोन दिवस तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.‍ तसेच दिनांक 19 मार्च नंतर आर्द्रतेत वाढ होऊन आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.‍ तसेच दिनांक 19 मार्च नंतर आर्द्रतेत वाढ होऊन आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची, किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून मळणी करून घ्यावी. हरभ-याच्‍या परिपक्‍वतेच्‍या काळात पाने पिवळी पडतात, घाटे वाळु लागतात. त्‍यानंतर पिकाची कापणी करावी. अन्‍यथा पीक जास्‍त वाळल्‍यास घाटेगळ होऊन पिकाचे नुकसान होते. उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर पेरणी केलेलया गहू पिकाची कापणी व मळणी करावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावि. उन्हाळी सोयाबीन पिकात शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 या द्रवरूप रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, फळगळ दिसून येत असल्यास 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी.  काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे भाजीपाल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हात फवारणी करू नये.  

फुलशेती

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्हाळी चारा पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

तुती लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासून 4 ते 5 वेळा दिड महिन्याच्या अंतराने तुती फांद्या कापणी करून रेशीम कीटकांना खाद्या आपण देत असतो. यामध्ये तुतीच्या वाढीचा 3 ते 4 फुटापर्यंतचा मोठा जैविक घटक तुती खाद्य म्हणून वारंवार वापरला जात असल्यामुळे जमीनीत सेंद्रीय खत देणे आवश्यक आहे. म्हणजे 20 मोडन प्रति हेक्टर प्रति वर्ष किंवा 5 मे.टन गांडूळ खत 2 मे. टन/एकर वर्षातून दोन वेळा जुन व नोव्हेंबर महिण्यात समान दोन हप्त्यात द्यावे. तेव्हा दर्जेदार तुती पानाचे उत्पादन मिळते. अन्यथा तिसऱ्या वर्षापासून पुढे जास्त फटवे फुटुन तुती पानाची प्रत खालावते व रेशीम कीटक कुपोषीत राहतात. रोगास बळी पडतात व कोषाचे पीक वाया जाते.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक101/2021 - 2022      गुरूवार, दिनांक – 17.03.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...