हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 01 ऑक्टोबर
रोजी आकाश अंशत: ढगाळ तर दिनांक 02 ते 04 ऑक्टोबर दरम्यान आकाश स्वच्छ राहण्याची
तर दिनांक 05 ऑक्टोबर रोजी नांदेड, हिंगोली व धाराशिव जिल्हयात आकाश दूपारनंतर
अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 व 05 ऑक्टोबर रोजी तूरळक
ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात हळूहळू
1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही. पुढील तीन ते चार
दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 04 ते 10 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
संदेश : शेतकरी
बांधवांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी, फवारणीची
कामे पावसाची उघाड बघून करावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. कापूस पिकात बाह्य बोंड सड
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 25% ईसी 200
मिली किंवा प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 500 ग्रॅम किंवा
पायरॅक्लोस्ट्रोबीन 20 % डब्ल्यूजी 200 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकात अंतर्गत बोंड सड
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 500 ग्रॅम प्रति एकर
फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी,
फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25%
एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी
60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति
एकर फवारणी करावी. तुर पिकात पाने
गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची
किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस
तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी
पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या
पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. रब्बी सुर्यफुल पिकाच्या पेरणीसाठी
पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी सुर्यफलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या
पहिल्या पंधरवाडयात करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत खतमात्रा दिली नसल्यास 50 ग्रॅम नत्र प्रति झाड देण्यात
यावे. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेत रोगाचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास रोगनाशकाची फवारणी करण्यात यावी. आंबा बागेत किडींचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, बागेत किटकनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पूर्ण वाढलेल्या व
काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत
पाठवावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गवार या
पिकामध्ये पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व
प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात वाढ झाल्यामूळे, जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये
बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे, तसेच जनावरांना शक्यतो
हिरवा चारा, मिनरल मिक्सर जिवनसत्वे व त्याचसोबत पाण्यातून खायचे मिठ द्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 53/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 01.10.2024
No comments:
Post a Comment