हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून
प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड,
जालना, परभणी,नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे तर लातूर
जिल्हयात वादळी वारासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी
छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी व धाराशिव
जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यात
हलक्या पाऊसाची शक्यता आहे. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे.
संदेश : मराठवाड्यात
19 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी
मुसळधार तर पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे
पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा व फवारणीची कामे दोन दिवस पुढे ढकलावीत किंवा पावसाची उघाड व वापसा बघून करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही
याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कापूस पिकात आकस्मिक मर
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सीक्लोराइड 250 ग्रॅम + 2 किग्रॅ युरिया + 1 किग्रॅ पांढरा पोटॅश (00:00:50 खत) 100 लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंध्याशी फवारणी पंपाद्वारे किंवा डबा / बाटली / मगाद्वारे तयार द्रावण
प्रति झाड 100 मिली याप्रमाणात आळे / बांगडी पद्धतीने आळवणी करावी व
त्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळील माती पायाने दाबून घ्यावी. फवारणीची कामे दोन
दिवस टाळावीत किंवा पुढे ढकलावीत. तूर पिकात
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम किंवा 50 मिली +
19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन वापसा झाल्यानंतर फवारणी करावी. फवारणीची कामे दोन दिवस टाळावीत किंवा पुढे ढकलावीत. मूग/उडीउ
पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा. भूईमूग पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा. फवारणीची कामे दोन दिवस टाळावीत किंवा पुढे ढकलावीत. मका पिकात
अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. फवारणीची
कामे दोन दिवस टाळावीत किंवा पुढे ढकलावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. केळी बागेत रोगनाशकाची
आळवणी करावी. आंबा बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व
साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सिताफळ बागेत
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा.
भाजीपाला
भाजीपाला पिकात पाणी साचून
राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुलपिकात पाणी साचून राहणार नाही
याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
कुक्कुट पालन एकदम हवेशीर, शेडची गळती एकदम कोरडे गारी/लिटर आणि
पावसाच्या पाण्याचा शेडच्या परिसरातील योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी तसेच
पिण्यास स्वच्छ पाण्याची अहोरात्र व्यवस्था होईल याची काळजी घ्यावी. शेळ्यांच्या
शेडमधील बेडींग/झोपण्यासाठी पसरलेला पेंडा स्वच्छ व कोरडा राहील याची दक्षता
घ्यावी. ह्या काळात नियमीत निर्जंतूकीकरण व परोपजिवी प्रतिबंधक उपाय करावेत.
पावसाळ्यात आर्द्रता, तापमानात
बदल, पाणी साचणे, चिखल आणि माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव
दिसून येतो, ज्यामुळे
पशुधनाचे आरोग्य बिघडते. यासाठी खालील उपाययोजना कराव्यात. पशुधनासाठी सुरक्षित आणि
स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था करा, गोठ्याच्या
परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा आणि दर 15 दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने गोठा
निर्जंतुक करा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 41/2025- 2026 मंगळवार,
दिनांक –
19.08.2025
No comments:
Post a Comment