Friday, 10 June 2022

दिनांक 10, 11 व 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 13 व 14 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 10, 11 व 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 13 व 14 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग मागील आठवडयाच्या तूलनेत कमी झालेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक (ईआरएफएस) क 15 जून ते 21 जून, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार दिनांक 15 ते 21 जून , 2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तुर हे आंतरपीक 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे आंतरपीक 1:1 किंवा 2:1 या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. आंतरपीक पध्दतीमध्ये खरीप ज्वारी + सोयाबीन 2:4 किंवा 3:6 या प्रमाणात दोन ओळीतील अंतर 45 सेंमी ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तुर 3:3 ‍किंवा 4:2 या प्रमाणात आंतरपीक घेता येते. सोयाबीन, मुग, उडीद ही कमी कालावधीची पिके आंतरपीके म्हणून घेताना 2:4 या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. खरीप ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. बाजरी पिकामध्ये बाजरी + तुर हे आंतरपीक 2:1, 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. बाजरी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. ऊस पिकात आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या चार महिन्यापर्यंत वाढ होतील अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये मिरची, घेवडा, कोथंबीर इत्यादी सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद या पिकांमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत मृगबहारासाठी खत मात्रा दिली नसल्यास मोसंबीसाठी 400:400:40‍0 व संत्र्यासाठी 500:500:500 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा. डाळिंब बागेत मृगबहारासाठी खत मात्रा दिली नसल्यास डाळींबासाठी 300:250:250  ग्राम प्रति झाड  नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा. चिकू बागेत खत मात्रा दिली नसल्यास 500:500:500 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी.  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

मका या चारापिकाच्या लागवडीसाठी आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगासफेद, विजय इत्यादी जातींची निवड करावी.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

तुती रेशीम उद्योग

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतीची बेण्यापासून लागवड केली असेल अशा शेतात मोठया प्रमाणावर 20-25 % पर्यंत तुट राहते. मनरेगा योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षात 90 टक्के झाडांची संख्या असणे आवश्यक आहे त्यामुळे तुतीची लागवड बेण्याएवजी 3 महिने वयाच्या रोपांपासून करण्याची महाराष्ट्र शासनाने सक्ती केली आहे. लागवउ केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन अपेक्षित तुती पानांचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

हाडाच्या मजबुतीसाठी कॅल्सीयम युक्त अन्नपदार्थ नियमित घ्यावेत, उदा. दूध व दूधाचे पदार्थ, शेवग्याची पाने, फुलकोबीची पाने, नाचणी, बीट, हरभऱ्याची पाने, चमकुरा, कडीपत्ता, तीळ इत्यादी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक21/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 10.06.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...