Friday 15 July 2022

दिनांक 18 जुलै रोजी लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जुलै रोजी लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जुलै रोजी लातूर, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जुलै रोजी लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी  हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 15 ते 21 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा तर दिनांक 22 ते 28 जुलै दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेले आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

जास्त पाऊस झालेल्या भागातील खरीप पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर 0.5 % (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) फेरस सल्फेटची  पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड (II) 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी. सोयाबीन पिकात खोडमाशी व उंटअळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम  12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  जास्त पाऊस झालेल्या भागातील कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.  कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी 40 ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रिड 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील खरीप ज्वारी पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील बाजरी पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील ऊस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जास्त पाऊस झालेल्या भागातील  संत्रा/मोसंबी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील  डाळीब बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील  चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. जास्त पाऊस झालेल्या भागातील  द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटीकेतील रोपांना बुरशी नाशकाची  आळवणी करावी. सध्या बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात  अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

चारा पिके

जास्त पाऊस झालेल्या भागातील चारा पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

तुती रेशीम उद्योग

वनस्पतीच्या वाढीसाठी सोळा प्रकारचे अन्न द्रव्य अवश्यक असतात. हवा, सुर्यप्रकाश आणि  पाणी अन्न तयार करण्यासाठी या  तिन घटकांची गरज असते. ढगाळ हवामानात सुर्यप्रकाशाच्या अभावामूळे पिकाची वाढ खुंटते. भारतात भरपूर सुर्यप्रकाश मिळत असल्यामूळे बारामाही रेशीम कोष उत्पादन शक्य आहे. जमिनीचा सामू 6.5 ते 7.3 पर्यंत असावा. सामू आम्ल किंवा अल्काईन असल्यास तुती वृक्षास अन्नघटक जमिनीतून घेणे शक्य होत नाही. जमिन आम्ल धर्मी असेल व 1.0 ने वाढवायची असेल तर 4 टन प्रति हेक्टर चूना (कॅल्शियम कार्बोनेट) व जमीन अल्काईन असेल व 1.0 ने कमी करण्यासाठी तेवढेच जिप्सम जमिनीत टाकावे लागते.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक31/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 15.07.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...