प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 व 06 मार्च 2023 रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात दि. 04 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दि. 07 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जालना जिल्हयात दि. 07 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्हयात दि. 07 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बीड जिल्हयात दि. 05, 06 व 07 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभागामध्ये पुढील 2 दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1
ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 03 ते 09 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते
सरासरीपेक्षा जास्त, कमाल व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त
राहण्याची शक्यता आहे तर दिनांक 10 ते 16 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल
व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला
आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 08 ते 14 मार्च 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, काढणीस तयार असलेल्या हरभरा, करडई, रब्बी ज्वारी व गहू पिकाची लवकरात लवकर काढणी
करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेला हरभरा गोळा करून पॉलिथीन शीटने/ताडपत्रीने
झाकून ठेवावा. मळणी केलेला हरभरा सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवावा. सध्या हळदीची
काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश
करणे ही कामे सुरू आहेत. तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या
पावसाची शक्यता असल्यामूळे, हळदीची
उघडयावर साठवण करू नये. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम
जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या
पावसाची शक्यता असल्यामूळे, काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून
घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे,
फळधारणा सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा
संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान
संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.तूरळक ठिकाणी
गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, काढणीस तयार असलेल्या
द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी
पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित
राहण्यासाठी द्राक्ष बागेत आच्छादन करावे. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे आंबा बागेत
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. सध्या आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या
आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15
पीपीएम ची फवारणी करावी.
चारा पीके
तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात
भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून
साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
भाजीपाला
तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. भाजीपाला
पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ व
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा
संध्याकाळी पाणी द्यावे.
फुलशेती
तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून
बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे फुल
पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या
विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता
येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट, आवळा आणि
नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता
येतात. पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे
रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरील तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत
सोपे आहेत. हे रंग कमी खर्चात तयार करता येतात आणि या व्यवसायासाठी लागणारी
गुंतवणूक ही अत्यल्प असून निव्वळ नफा भरपूर आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 97/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
03.03.2023
No comments:
Post a Comment