Tuesday, 30 May 2023
दिनांक 30 मे रोजी औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 30 मे रोजी औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 02 ते 08 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 जून 2023
दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त
व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू
कापूस लागवडीसाठी भारी व काळया जमिनीमध्ये दोन-तिन वर्षानी एक वेळा खोल नांगरणी
करावी. नांगरणी नंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात.
शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायती लागवडीसाठी
10 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात
समप्रमाणात पसरावे. तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी एक नांगरणी व वखराच्या 2 ते 3
पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत
हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. मुग/उडीद लागवडीसाठी एक नांगरणी व
कुळवाच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी
5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. भुईमूगाच्या पेरणीसाठी बळीराम देशी नांगराची एक
ते दोन नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळी पूर्वी
प्रति हेक्टरी 10 गाडया शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. सध्याच्या
काळात उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी सुरू आहे, वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणी
केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शेंगा पावसात
भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या एक ते दोन
पाळया देऊन जमिन तयार करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळीच्या
नवीन लागवडीसाठी लागवड करण्या अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले
शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. नवीन लागवड केलेल्या व
लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन
पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. आंब्याच्या नवीन
लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे
घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे व
पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. नविन लागवड केलेल्या आंबा
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर
किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना
उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच
बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त
फुटव्यांची विरळणी करावी. सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड
घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल
पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे.
भाजीपाला
खरीप
हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी.
भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
खरीप
हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही
याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळा
ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी
त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून
संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा
म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी
मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा
आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
उन्हाळयात
वातावणातील वाढत्या तापमानामुळे भाजीपाला लवकर सुकून जातो. अशावेळी घरात फ्रिज
उपलब्ध नसल्यास भाजीपाला ठेवण्यासाठी जुना माठ किंवा झाडाची रिकामी कुंडी घ्यावी.
त्यामध्ये पाणी घालून भाज्या ठैवलेले भांडे अशा पध्दतीने ठेवावे की जेणेकरून त्यात
माठातील/कुंडीतील पाणी जाणार नाही. भाजीपाला अशा प्रकारे ठेवल्यास माठातील
कुंडीतील तापमान कमी होऊन भाजीपाला ताजा
राहण्यास मदत होते.
ईतर
शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून
गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी
बोर्ड,भिंती, भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणी लपून बसलेल्या गोगलगायी शक्य
तितक्या प्रमाणात जमा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना
टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 17/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 30.05.2023
Friday, 26 May 2023
दिनांक 29 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 30 मे रोजी नांदेड, लातूर, उसमानाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच इतर जिल्हयात दिनांक 29 व 30 मे रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळहळू 2 ते 3 अं.से.ने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 29 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 30 मे रोजी नांदेड, लातूर, उसमानाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच इतर जिल्हयात दिनांक 29 व 30 मे रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 26 मे ते 01 जून 2023 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी व दिनांक 02 ते 08 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी
झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 मे ते 06 जून 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तिन वर्षात एकदा खोल
(30 ते 45 सें.मी.) नांगरणी करावी. नांगरणीनंतर दोन ते तिन वखराच्या पाळया देऊन
जमिन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 20 गाडया (5 टन) शेणखत किंवा
कंपोस्टखत जमिनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी
बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी पेरणीसाठी एकदा नांगरणी करून 2 ते 3 वखराच्या पाळया देऊन जमिनीची मशागत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी
10 ते 15 गाडया चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. बाजरीच्या पेरणीसाठी जमिनीची नांगरट करावी व वखराच्या
2 पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळीपूर्वी हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत
जमिनीत मिसळावे. अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची उन्हाळयात खोल नांगरट करून जमिन
तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कूळवाच्या उभ्या-आडव्या पाळयानंतर सपाटीकरण करावे.
दूसऱ्या नांगरणीपूर्वी अडसाली लागवडीसाठी प्रति हेक्टरी 25 टन शेणखत जमिनीत मिसळावे.
हळद लागवडीसाठी जमिनीची 18 ते 22 सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी.
नांगरटीनंतर शेतातील तणांचे अवशेष वेचून जाळून नष्ट करावेत. नांगरीनंतर कुळवणी
करावी. त्यानंतर ढेकळे फोडून घ्यावीत.शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 30 ते 40 टन
चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी लागवडीसाठी 1X1X1 मीटर या आकाराचे
खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 3 ते 4 घमेली शेणखत किंवा कंपोस्टखत व
पोयटा माती यांनी खड्डे भरून घ्यावे. संत्रा/मोसंबी मृग बहार नियोजनासाठी
शेतकऱ्यांनी बागेत नांगरणी करावी व शेणखत टाकण्यासाठी जमिन तयार करून घ्यावी. नविन
लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी बागेला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन
पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व
लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. डाळिंब
लागवडीसाठी घेतलेले खड्डे चांगली माती + चांगले कुजलेले व रापलेले शेणखत + 1 ते
1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + पालापाचोळा यांनी जमिनीपासून वर 15 ते 20 सेंमी
खड्डे भरून घ्यावेत व मधोमध एक बांबूची काठी लावावी. डाळींब मृग बहार नियोजनासाठी
शेतकऱ्यांनी बागेत नांगरणी करावी व शेणखत टाकण्यासाठी जमिन तयार करून घ्यावी. नविन
लागवड केलेल्या डाळींब बागेला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन
पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व
लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. चिकू लागवडीसाठी
घेतलेले 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे अर्धा किलो सुपर फॉस्फेट,
1:3 या प्रमाणात शेणखत + माती या मिश्रणाने खड्डे भरावे. नविन लागवड केलेल्या चिकू
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा
सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून
संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत
खोडाजवळ आच्छादन करावे.
चारा पीके
चारा पिकाच्या लागवडीसाठी एक नांगरट
करून दोन ते तिन वेळा वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत हेक्टरी 20 ते 25
टन कंपोस्ट खत मिसळावे.
भाजीपाला
टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी जमिन खोलवर
नांगरून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावेत.
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार
आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. भाजीपाला
पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार
सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी
फुलपिकानूसार जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या
पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल
पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी
किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
पशुधन
व्यवस्थापन
तापमान-आर्द्रता-निर्देशांकामध्ये वाढ झाल्याने दुधाळ जनावरावर हिट ट्रेस (उष्णतेचा ताण) होतो. दुधाळ
जनावरांमध्ये तापमान-आर्द्रता निर्देशांकात वाढ झाल्याने दुध
उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी
होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी
त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण
करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी.
पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची
शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत.
जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात
भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर
ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास
झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला
थांबू नये.
तुती रेशीम उद्योग
पलटी नांगराच्या साहाय्याने जमिनीची
नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी. जमिन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन/हे. शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात
जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी द्यावे. गांडूळ
खत पाच मेट्रीक टन/हे. म्हणजे दोन टन/एकर दोन समान हप्त्यात द्यावे. तूती लागवडीसाठी तूती
रोप वाटीका 3 आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन महिने अगोदर
करावी. वर्षात तीन वेळा रोप वाटीका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन
महिन्यानंतर शेतात रोपे लागवड करावी. जून ते सप्टेंबर
महिन्यापर्यंत तूती लागवड करता येते.
कृषि
अभियांत्रिकी
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी
उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून
गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी
बोर्ड,भिंती, भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणी लपून बसलेल्या गोगलगायी शक्य
तितक्या प्रमाणात जमा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना
टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 16/2023
- 2024 शुक्रवार, दिनांक – 26.05.2023
Tuesday, 23 May 2023
दिनांक 23 मे रोजी लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 23 मे रोजी लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 26 मे ते 01 जून 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 28 मे ते 03 जून 2023
दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मध्यम
ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कापूस
पिकाची लागवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड
जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60
ते 100 सेंमी असावी, जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 एवढा असावा. मध्यम
ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या
जमिनीत तूर पिकाची लागवड करावी. तुरीच्या पिकास चोपन व
क्षारयुक्त जमिन मानवत नाही. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य
असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे
पिवळी पडतात. योग्य निचऱ्याच्या मध्यम ते भारी जमिनीत
मुग/उडीद या पिकांच्या लागवड करावी. एकदम
हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे
पीक घेऊ नये. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर
प्रमाण असलेल्या जमिनीत भुईमूग पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची
चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत
होते. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे
काढणी केलेल्या भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर लागवड केलेल्या
व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी कोरड्या हवामानात करावी. मध्यम
ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनी मका पिकाची लागवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काळी
व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केळीची मृग बाग लागवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व
लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी
बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन
पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. मध्यम ते भारी प्रतीची
पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडीशी आम्लयुक्त जमिनीत आंबा
पिकाची लागवड करावी. चोपन व
चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये. जमिनीची खोली कमीतकमी 1.5 ते 2 मीटर असावी.
नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक
सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड
केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वेळेवर एप्रिल
छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी. मुरमाड, अत्यंत हलक्या,
डोंगर उताराच्या जमिनीत तसेच मध्यम खोल जमिनीत सिताफळ लागवड करावी.
भाजीपाला
खरीप
हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम
काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला
पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला
पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार
सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
तापमान-आर्द्रता-निर्देशांकामध्ये
वाढ झाल्याने दुधाळ जनावरावर हिट ट्रेस (उष्णतेचा ताण) होतो. दुधाळ जनावरांमध्ये तापमान-आर्द्रता
निर्देशांकात वाढ झाल्याने दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ
व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या
गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी
जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या
बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15
फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणीद्यावे.
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे
चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू
किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी
घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर
धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच
पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
उन्हाळ्यामध्ये
अतिउन्हामध्ये काम करत असताना अतिशय घाम येतो. घशाला कोरड पडते व शरीरातील पाणी
कमी होते. त्यामूळे दवाखान्यात भरती देखील व्हावे लागते. तेव्हा अशा बाबी
टाळण्यासाठी डोकयाला रूमाल बांधावा व अंगात सनकोट किंवा घरात कापूस वेचणीकोट अथवा
पूर्ण भायाचा शर्ट असेल तर तो घालावा. अंगावर फिक्या रंगाचे कपडे घालावे. जेणेकरून
उन्हाची किरणे परावर्तित होतील. घाम आल्यामूळे शरीरातील क्षार कमी होतात. यावर
उपाय म्हणून लिंबू, मीठ व साखर यांचे शरबत करून ठेवून थोड्या थोड्या वेळाने घेत
रहावे. तसेच काम करत असताना सावलीत अधून मधून विश्रांती घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 15/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 23.05.2023
Friday, 19 May 2023
मराठवाडयात नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 22 मे रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 3 ते 4 दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची
शक्यता आहे. मराठवाडयात नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 22 मे रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 19 ते 25 मे 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरी पेक्षा कमी व दिनांक 26 मे ते 01 जून 2023 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 मे 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या
जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त
आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन
लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या
प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम
निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामु 5.5 ते 8.4 पर्यंत असावा. बाजरी या पिकाच्या
पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. अडसाली ऊस
लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी.
पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद
लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन
निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्षिक तणे असू नयेत. जमिनीत
पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते
7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते. सध्याच्या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून
घ्यावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल
भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी. अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन
निवडू नये. सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता
घ्यावी तसेच फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी
सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. डाळींब
लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिन निवडावी. जमिनीचा सामू
6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम
काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये.
चारा पीके
खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या
लागवडीसाठी मध्यम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची
निवड करावी.
भाजीपाला
खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो,
कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन
निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची
काढणी करून घ्यावी.
फुलशेती
खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम
ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.
तुती रेशीम उद्योग
पलटी नांगराच्या साहाय्याने जमिनीची
नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी. जमिन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन/हे. शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर
महिन्यात खत देऊन हलके पाणी द्यावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन/हे. म्हणजे दोन टन/एकर दोन समान हप्त्यात द्यावे. तूती लागवडीसाठी तूती रोप
वाटीका 3 आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन
महिने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोप वाटीका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात रोपे
लागवड करावी. जून
ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तूती लागवड करता येते.
सामुदायिक विज्ञान
दोन टक्के आवळयाच्या पानाच्या अर्काचा
वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ
प्रतिबंघित करता येते. आवळयाच्या पानाच्या अर्कासह 6 % सीट्रिक ॲसिड घेऊन सुती
कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सुक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा
प्रतिबंध कापडाच्या पाच धुण्यानंतर कमी
झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्टयपूर्ण
कपडयांना उदा. अवगुंठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पटृटया यावर
केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.
कृषि
अभियांत्रिकी
शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून
घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल.
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी
जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 14/2023
- 2024 शुक्रवार, दिनांक – 19.05.2023
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...