Tuesday 27 June 2023

दिनांक 27 जून रोजी हिंगोली, नांदेड, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 27, 28 व 29 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 30 जून व 01 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 27 जून रोजी हिंगोली, नांदेड, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 27, 28 व 29  जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 30 जून व 01 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 30 जून ते 06 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 जूलै 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे  पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे. 

सध्या पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस बियाण्यास सुडोमोनास फ्ल्युरोसन्स 10 ग्रॅम प्रति किलो  बियाणे किंवा कार्बेंडेझीम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिज प्रक्रिया करावी. यामूळे मर व करपा यासारख्या रोगांचा प्रादूर्भाव कमी होतो. नत्र स्थिरीकरणासाठी ॲझॅटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पेरणीपूर्वी तूर बियाण्यास कॅप्टान 80 टक्के किंवा थायरम 75 टक्के 20 ग्रॅम किंवा कार्बेंन्डॅझिम 15 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग/उडीद पेरणीपूर्वी बियाण्यास 1 ग्रॅम कार्बेंन्डॅझिम किंवा 2 ग्रॅम थायरम  प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक रायझोबियम व पीएसबी 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 75 टक्के  किंवा कार्बोक्झीम 37.5 टक्के + थायरम 37.5 टक्के 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम 12 टक्के + मॅन्कोझेब 63 टक्के 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकास पेरणीपूर्वी सायॲन्ट्रानिलीप्रोल 19.8% + थायामिथॉक्झाम 19.8% एफएस 6 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी या बिजप्रक्रियेमूळे पेरणीनंतर 15 ते 20 दिवसापर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते. बियाण्यास थायरम 2 ते 2.5 ग्रॅम तसेच ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी, आंबा, सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबा फळबागेत 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. झाड दहा वर्षापेक्षा मोठे असल्यास 1000:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. सिताफळ बागेत 300:300:300 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयामध्ये शक्यतो शेळ्या मेंढ्यांना उघडयावर ठेवण्याऐवजी शेडमध्ये बांधावे त्यामूळे त्यांना पावसाचा मार बसणार नाही आणि त्यांचे शरीर तापमान कमी होणार नाही. भिजल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फूसाचा दाह  होण्याची शक्यता असते (थंड पाण्याच्या मारामूळे) तसेच दलदल जमीनीमूळे खूर सडण्याची समस्या उद्भवणार नाही. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी.

सामुदायिक विज्ञान

मातेचे पहिले दूध नवजात शिशूस पाजण्यापूर्वी इतर पदार्थ जसे-मध, एरंडेल तेल, ग्लुकोजचे पाणी इ. देणे टाळावे. सुरूवातीच्या सहा महिन्यात नवजात बालकास केवळ स्तनपान देणेच योग्य आहे.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक25/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 27.06.2023

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...