प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे
राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने
घट होऊन त्यानंतर किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 15 ते 21 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 17 ते 23 डिसेंबर 2023
दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस
पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावरील 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी
करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच
कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी
पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट
लावावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे
तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम + मेटॅलॅक्झील + मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व
लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10
लिटर किंवा थायमिथॉक्झाम 12.6%
+ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5%
2.5 मिली किंवा इमामेक्टीन
बेन्झोएट 5% 4 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे मका पिकात
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन
बेन्झोएट 5 टक्के 80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम
11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी
करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत 50 ग्रॅम पोटॅशियम
प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेतील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी बागेत
बायोमिक्स 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच 200 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे आंबा पिकामध्ये भूरी रोगासाठी
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गंधक सल्फर 80% 40
ग्रॅम किंवा
हेक्झाकोनॅझोल 5 एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत घडांचा आकार
वाढवण्यासाठी द्राक्ष घड 10 पिपिएम जिब्रॅलिक ॲसिडच्या द्रावणात बूडवावेत.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे
भाजीपाला पिकात (टोमॅटो, मिरची, वांगी) करपा या रोगांचा प्रादूर्भाव होऊ शकतो या
रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब 75% किंवा क्लोरोथॅलोनील 75% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच
कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून
त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत.
पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. पशुधनातील
प्रजननाच्या समस्यांचे वेळेत निदान आणि योग्य उपचार न केल्यास अधिक तोटा उदभवतो.
राज्य शासनाच्या “राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानातंर्गत” आपल्या कडील सर्व
जनावरांची गाभण करण्याबाबतची तपासणी व उपचार करून घ्यावेत.
सामुदायिक विज्ञान
सकाळचा नाश्ता एक महत्वाचे जेवण आहे कारण रात्रभर उपाशी राहील्या
नंतर सकाळच्या नाश्त्यामूळे शरीराला लागणाऱ्या उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य
चांगल्या आरोग्याकरीता आवश्यक आहे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 73/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 12.12.2023
No comments:
Post a Comment