Tuesday 16 April 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 16 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात, दिनांक 17 एप्रिल रोजी धाराशिव व लातूर जिल्हयात, दिनांक 18 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 16 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात, दिनांक 17 एप्रिल रोजी धाराशिव व लातूर जिल्हयात, दिनांक 18 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमनात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहील.

सामान्य सल्ला:

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 एप्रिल 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा. भुईमूग पिकात आऱ्या सुटल्या नंतर अंतर मशागत करू नये. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 एप्रिल ते 15 मे या दरम्यान करावी.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात लवकर करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

पशुधन व्यवस्थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने  भिजवून ठेवावे.

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

कृषि अभियांत्रिकी

रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक05/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक 16.04.2024

 

 

 

No comments:

Post a Comment