प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे. दिनांक 04
जून रोजी छत्रपती संभाजी नगर,
जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्हयात तर
दिनांक 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव,
बीड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक 06 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड,
नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 07 जून रोजी छत्रपती संभाजी नगर,
जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी छत्रपती संभाजी नगर,
बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व
मौसमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू
3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात
फारशी तफावत जाणवणार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा
जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी
शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस
पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना
जमिन व हवामान, कोरडवाहू किंवा बागायती,
लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा
विचार करून वाणांची निवड करावी. तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711,
बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716, बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811,
पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा. मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4,
बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4
इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद
लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. भुईमूग
पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24,
टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123
इत्यादी वाणांचा वापर करावा. मका पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा,
डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी
वाणांचा वापर करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन,
अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड
केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण
करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड
केलेल्या व लहान केळी, आंबा व सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.
नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी,
तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन
मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी. नविन सिताफळ बाग लागवडीसाठी
बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी
शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी
पिकांची काढणी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन
लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
फुलशेती
तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या
फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून
पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा
ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची
मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या
मार्गदर्शनाखाली औषधोपचार लसीकरण आणि
पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या
दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे,
ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा
होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
घरातील खोल्या लहान असतील तर भिंतीना फिका रंग द्यावा त्यामूळे
खोली मोठी असल्याचा आभास निर्माण होईल.
गडद रंगामुळे खोली अधिक लहान वाटते.
कृषि अभियांत्रिकी
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल
नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी बोर्ड,भिंती, भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणी लपून बसलेल्या
गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात जमा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे
मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 19/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 04.06.2024
No comments:
Post a Comment