प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 जून रोजी
छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी लातूर व
धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची
शक्यता आहे. दिनांक 07 जून रोजी नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक
08 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर
दिनांक 09 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे. दिनांक 10 जून रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू
2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू
घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा
कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची व 14 ते 20 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 12 ते 18 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी पेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
सध्याचा होणारा पाऊस हा पूर्व
मौसमी पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पेरणीसाठी अति लवकर
येणारे वाण: परभणी सोना (एमएयुएस-47), लवकर येणारे वाण: एमएयूएस-71 (समृध्दी),
एमएयुएस-158, एमएयुएस-612, जवाहर (जेएस-335), शक्ती (एमएयुएस-81), मध्यम उशिरा
येणारे वाण: प्रसाद (एमएयुएस-1), प्रतिकार (एमएयूएस-61), एमएयुएस-162, प्रतिष्ठा
(एमएयूएस 61-2) इत्यादी वाणांचा वापर करावा. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी
शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. खरीप ज्वारी पेरणीसाठी
संकरीत वाण: सीएसएच-14, सीएसएच-16, सीएसएच-25 (परभणी साईनाथ), सुधारीत वाण: परभणी
शक्ती, पीव्हीके-809, पीव्हीके-801 (परभणी श्वेता) इत्यादी वाणांचा वापर करावा. बाजरीच्या
पेरणीसाठी संकरीत वाण: सबुरी, श्रध्दा, शांती, एएचबी-1269, एएचबी-1200 (एफई) सुधारीत वाण:
आयसीटीपी, समृध्दी, परभणी संपदा या वाणांचा वापर करावा. ऊस पिकात आंतरमशागतीची
कामे करून तणांचे नियंत्रण करावे. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्णा, राजापूरी, फुले
स्वरुप या सुधारीत जातींची निवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा नविन बाग लागवडीसाठी
नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी,
डाळींब व चिकू झाडांना काठीने आधार द्यावा. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची
शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर फळबागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता,
इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची
खरेदी करावी. चिकू नविन बाग
लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय
नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
खरीप हंगामात भाजीपाला
लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या
लागवडीसाठी परभणी तेजस, पूसा ज्वाला, अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-4, जी-3 इत्यादी
जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री,
ए.टी.एच-1, पुसारूबी, धनश्री, भाग्यश्री, आर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी मध्यम ते मूसळधार पावसासाची
शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात
साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
फुलशेती
खरीप हंगामात फुलपिकांच्या
लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. गुलाब पिकाच्या
लागवडीसाठी ग्लॅडीयटर, सुपर स्टार, डबल डिलाईट, रेड मास्टर पीस इत्यादी जातींची
निवड करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी मध्यम ते
मूसळधार पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी
करून घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे पाऊस
झाल्यानंतर फुल पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
चारा पिके
मका या चारापिकाच्या लागवडीसाठी
आफ्रिकन टॉल, मांजरी, कंपोझीट, विजय, गंगासफेद, डेक्कन हायब्रीड या वाणांची निवड
करावी.
तुती रेशीम उद्योग
तुती रोपवाटीका जुन महिन्यात एक
एकर क्षेत्रासाठी 2 गुंठे क्षेत्रावर गादी वाफे करावेत. 50X3X1.5 फुट (लांबी-रुंदी-उंची) आकाराचे 3 गादी वाफे करावेत. 06 ते
08 महिने वयाचे तुती बेणे करण्यासाठी निवडावी. 3 ते 4 डोळे असलेले बेणे पेन्सील
आकाराचे निवडून धारदार सिकेटरच्या साहाय्याने डोळ्याच्या लगत खालील बाजूस स्लॅटींग
कट व 3 डोळ्याच्या वरच्या डोळया लगत फ्लॅट कट घेऊन बेणे तयार करावे. बेणे तयार
करताना बेण्याची साल फाटणार नाही याची काळजी घ्यावी. रोगीट बेण्याची छाटणी साठी
निवड करू नये. 5X3X2 किंवा 6X3X2 फुट पट्टा पध्दत लागवडीसाठी एकरी 6 हजार बेणे लागवड करावी. दोन भाग शेणखत
व एक भाग माती या प्रमाणे जमीनीपासून 1.5 फुट उंचीच्या गादी वाफ्यावर 22 सेंमी
लांबीचे तुती बेणे दोन ओळीत 15 सेंमी व दोन बेण्यात 10 सेंमी अंतर ठेवून लागवड
करावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक
आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक
सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक
सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची
लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी
मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा
आवश्यक ठरते.
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
उन्हाळयात वातावणातील वाढत्या
तापमानामुळे भाजीपाला लवकर सुकून जातो. अशावेळी घरात फ्रिज उपलब्ध नसल्यास
भाजीपाला ठेवण्यासाठी जुना माठ किंवा झाडाची रिकामी कुंडी घ्यावी. त्यामध्ये पाणी
घालून भाज्या ठैवलेले भांडे अशा पध्दतीने ठेवावे की जेणेकरून त्यात
माठातील/कुंडीतील पाणी जाणार नाही. भाजीपाला अशा प्रकारे ठेवल्यास माठातील
कुंडीतील तापमान कमी होऊन भाजीपाला ताजा
राहण्यास मदत होते.
कृषि अभियांत्रिकी
शंखी गोगलगायीच्या
व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या
सूप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी
बोर्ड,भिंती, भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणी लपून बसलेल्या गोगलगायी शक्य
तितक्या प्रमाणात जमा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना
टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 20/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 07.06.2024
No comments:
Post a Comment