Friday, 27 September 2024

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 27 सप्टेंबर रोजी आकाश ढगाळ तर दिनांक 28 सप्टेंबर रोजी अंशत: ढगाळ तर दिनांक 29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


 हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 27 सप्टेंबर रोजी आकाश ढगाळ तर दिनांक 28 सप्टेंबर रोजी अंशत: ढगाळ तर दिनांक 29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 3 ते 4 अं.सं. ने हळूहळू वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 04 ते 10 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेला पावसाच्या अंदाज पाहता ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली असल्यास काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

काढणी केलेल्या सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्रॅम  किंवा टेब्यूकोनॅझोल 25.9% 12.5 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन, खरीप ज्वारी, ऊस व हळद पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागे बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

किटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक किंवा रासायनिक खत या चारही प्रकारच्या निविष्ठा रेशीम शेतीमध्ये चालत नाहीत. ज्या शेतामध्ये मिरची किंवा तंबाखूचे पीक असेल तेथे तुती लागवड करू नये. रेशीम किटक चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत मृत पावण्याचे हेच कारण होय. शेजाऱ्याने किटकनाशक फवारणी केली तरीही रेशीम किटकांवर परिणाम होतो. तेव्हा 20 मे.टन शेणखत/हेक्टर किंवा 5 टन गांडूळ खत/हेक्टर या प्रमाणात रेशीम शेतीमध्ये तुती लागवडीसाठी वापरणे गरजेचे आहे. निव्वळ रासायनिक खत वापरून वाढवलेल्या तुती बागेतील पानात रसायण अंश येत असल्याने अळ्या मृत पावतात.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता,  जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक52/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक 27.09.2024

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...