हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी मूसळधार ते खूप मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 26 सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 26 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, व नांदेड जिल्हयात तर दिनांक 27 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 23 व 27 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी, 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर 25 व 26 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 26
सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर कमाल
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
किंचीत कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश : मागील
दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज पाहता, पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल
पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
फवारणी व आळवणीची कामे जमिनीत वापसा व पावसाची उघाड बघून करावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची
शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही
याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू
लागल्यास 200 ग्रॅम युरिया+
100 ग्रॅम पांढरा पोटॅश
(00:00:50 खत )+25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची
माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. कापूस पिकात आंतरिक बोंड सड दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड
50% - 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून
फवारणी करावी. बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन
5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन
18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब
70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीकापूस पिकात
पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची
काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर
ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम अधिक युरीया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति
10 लिटर पाणी या प्रमाणात घेवून झाडांच्या मुळांना प्रति झाड 100 मिली द्यावे.
तसेच अशा ठिकाणी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे
आळवणी करावी.
काढणीस तयार असलेल्या मूग/उडीद पिकाची
काढणी/मळणी करून
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
मका पिकात पाणी साचून राहणार नाही याची
काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची
काढणी करून सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची
काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. केळी बागेत केळी झाडांना माती
लावावी व काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून
घ्यावी. केळी बागेतील अतिरिक्त पिलं व वाळलेली पाने काढून टाकावेत.
आंबा बागेत पाणी साचून राहणार नाही याची
काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आंबा फळ बागेत किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व मँगो
मॉलफॉरमेशन रोग होऊ नये म्हणून बागेत किटक नाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी
करावी.
द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही
याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. द्राक्ष बागेत पूर्व छाटणीची
तयारी करावी. द्राक्ष बागेत रोगग्रस्त
पानांची विरळणी करावी.
सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही
याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या सिताफळांची
काढणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात पाणी साचून
राहणार नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. लागवड केलेल्या भाजीपाला पिकतील तूट भरून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात पाणी साचून राहणार
नाही याची काळजी घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन
व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 51/2025- 2026 मंगळवार,
दिनांक –
23.09.2025
No comments:
Post a Comment