हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 08 फेब्रुवारी रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता
आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर किमान
तापमानात पुढील 48 तासात 1 अं.से. ने घट होण्याची तर त्यानंतर 24 तासात किंचित वाढ
होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 06 ते 12 फेब्रूवारी 2026 व दिनांक 13 ते 19 फेब्रूवारी 2026 दरम्यान
पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश : मराठवाडयात
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, पिकास, फळबागेस, भाजीपाला
व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या तूर पिकची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.
ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या ऊस पिकाची काढणी करून घ्यावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकाच्या
काढणीस साधारणत: काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे.
हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी
शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी
प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5%
(एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी
20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत
करता येते. उन्हाळी तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या बंदोबस्तासाठी
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) किंवा 2.5
ग्रॅम थायरम किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया करावी. नंतर ॲझॅटोफॉस 20
मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी
एकेटी-101, एकेटी-103, जेएलटी-408, एकेटी-64, एनटी-11-91 या वाणांपैकी वाणाची निवड
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम + चिलेटेड झिंक 500 ग्रॅम प्रति 100
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून
घ्यावी.
चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून
घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना
जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे तसेच दर पंधरा दिवसाला गोठा व गोठ्याचा
परिसरात किटकनाशकाची फवारणी करावी व गोठ्यातील खड्डा व भेगा असतील तर त्या बुजवून
घ्याव्यात व गोठा व गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 90/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 06.02.2026
No comments:
Post a Comment