हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात
पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच
दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची तर किमान तापमानात
किंचित घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 01 ते 07 मे 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जासत, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची व दिनांक 08 ते 14 मे 2026
दरम्यान पाऊस सरासरीएवढे, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व
किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : मराठवाडयात
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, पिकास, बागेस व भाजीपाला पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण
नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली
प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात काणी रोगाचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी बूरशीनाशकाची फवारणी करावी किंवा
प्रादर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
सध्या हळद उकडणे, वाळवणे ही कामे करून घ्यावीत.
उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12
ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने
करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या अंबे बहार फळांची काढणी करून घ्यावी. बागेतील
वाळलेल्या, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि छाटलेल्या फांद्यांवर व
खोडावर बोर्डो पेस्ट लावावी. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस ताण
देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नविन लागवड केलेल्या
व लहान संत्रा/मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा.
डाळींब बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या अंबे बहार फळांची काढणी करून घ्यावी. बागेतील वाळलेल्या, तुटलेल्या
आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर बोर्डो पेस्ट
लावावी. मृग बहार व्यवस्थापनासाठी डाळींब बागेस ताण देण्यासाठी पाणी देणे बंद
करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नविन लागवड केलेल्या व लहान डाळींब झाडांना
काठीने आधार द्यावा.
चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू
फळांची काढणी करून घ्यावी. उष्णतेपासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी झाडाला 1 % बोर्डो पेस्ट लावावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकात नागअळी चा प्रादुर्भाव
दिसून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल
18 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे
आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण
करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठ्यातील तापमान कमी
करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर
करावा. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिज मिश्रण आणि
मिठयुक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 09/2026-2027 गुरुवार,
दिनांक –
30.04.2026
No comments:
Post a Comment