Tuesday, 28 April 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी नांदेड जिल्हयात दूपारी/सायंकाळी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी लातूर जिल्हयात तर दिनांक 29 ‍एप्रिल रोजी नांदेड व लातूर जिल्हयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 व 29 एप्रिल राजी धाराशिव जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 01 ते 07 मे 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास  एनएए 10 पीपीएम ची फवारणी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी व डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. अति उष्णता आणि ओलाव्याचा ताण (Moisture stress) यामुळे फळबागांमध्ये फुले आणि फळे अकाली गळून पडतात. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पहाटेच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी हलके सिंचन करावे. दिवसाच्या कडक उन्हाच्या वेळी सिंचन करणे टाळावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) कीडींना आकर्षीत करण्यासाठी एकरी 10 ते 12 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टिन (30 पीपीएम) 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.

मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात पावसाची उघाड बघून मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. केळी बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत व बोधांना माती लावावी. उष्णतेच्या लाटेपासून घडाच्या संरक्षणासाठी घड झाकून ठेवावेत.

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. आंबा बागेत 0.1 % बावीस्टीनची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी करून घ्‍यावी.

सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी सिताफळ फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकात नागअळी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल 18 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठ्यातील तापमान कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिज मिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक08/2026-2027    मंगळवार, दिनांक 28.04.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी नांदेड जिल्हयात दूपारी/सायंकाळी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी लातूर जिल्हयात तर दिनांक 29 ‍एप्रिल रोजी नांदेड व लातूर जिल्हयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 व 29 एप्रिल राजी धाराशिव जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्...