हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 02 जूलै
रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 03 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची
शक्यता आहे. दिनांक 30 जून व 01 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 02 जूलै रोजी
छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड जिल्हयात तर दिनांक 03 जूलै रोजी छत्रपती
संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी
40 ते 50
कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 जून रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 01 जूलै रोजी धाराशिव,
लातूर, हिंगोली, बीड जिल्हयात तर दिनांक 03 जूलै रोजी परभणी, बीड जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 30 जून व 01 जूलै रोजी काही ठिकाणी तर
दिनांक 02 जूलै रोजी बहुतांश ठिकाणी तर दिनांक 03 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक
04 जूलै रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 02 जूलै ते 08 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयातील परभणी जिल्हयातील : परभणी तालूक्यातील (टाकळी कुंभकर्ण) गंगाखेड
तालूक्यातील (पिंपळदरी), जिंतूर तालूक्यातील (जिंतूर, बामणी, आडगाव, चारठाणा,
वाधीधानोरा), पूर्णा तालूक्यातील (चूडावा), सेलू तालूक्यातील (देऊळगाव, चिखलठाणा,
मोरेगाव), सोनपेठ तालूक्यातील (वडगाव), मानवत तालूक्यातील (मानवत, कोल्हा)
धाराशिव जिल्हयातील धाराशिव
तालूक्यातील (धाराशिव ग्रामीण, केसेगाव), तूळजापूर तालूक्यातील (सलगरा, इतकल),
कळंब तालूक्यातील (मोहा, सिराढोल, गोविंदपूर), वाशी तालूक्यातील (वाशी)
हिंगोली जिल्हयातील हिंगोली तालूक्यातील (
हिंगोली, नरशी, सिरसम, बासंबा, माळहिवरा) कळमनूरी तालूक्यातील (कळमनूरी) औंढा
तालूक्यतील (औंढा, जवळा बाजार) सेनगाव तालूक्यातील (गोरेगाव)
लातूर जिल्हयतील लातूर तालूक्यातील
(मुरुड) अहमदपूर तालूक्यातील (अहमदपूर, हडोळती) उदगीर तालूक्यातील (उदगीर) रेणापूर
तालूक्यातील (पानगाव, कारेपूर) जळकोट तालूक्यातील (जळकोट, घोनसी)
नांदेड जिल्हयातील बिलोली तालूक्यातील (सगरोळी,
कुंडलवाडी, अदमपूर) मूखेड तालूक्यातील (मूखेड, जाम, येवती, चांडोला, बऱ्हाळी,
मुक्रामाबाद) कंधार तालूक्यातील (कंधार, कूरूळा, फुलवळ, पेठवडज, बारूळ, डिग्रस
बुद्रुक) भोकर तालूक्यातील (भोकर) देगलूर तालूक्यातील (शहापूर) किनवट तालूक्यातील
(इसापूर, मांडवा, देहेली, सिंदगी, उमरी बाजार) मुदखेड तालूक्यातील (मुदखेड, मुगट)
माहूर तालूक्यातील (माहूर, वानोला, सिंदखेड) धर्माबाद तालूक्यातील (जारीकोट) उमरी
तालूक्यातील (गोळेगाव) अर्धापूर तालूक्यातील (अर्धापूर)
जालना जिल्हयातील जालना
तालूक्यातील (जालना शहर, जालना ग्रामीण, वांगरूळ, नेर, शेवली, विरेगाव, रामनगर,
पंचनवडगाव) अंबड तालूक्यातील (अंबड, धनगर पिंप्री, रोहिलगड, गोंधी) परतूर
तालूक्यातील (परतूर, वातूर, आष्टी, सृष्टी) बदनापूर तालूक्यातील (शेळगाव, बावनी,
रोशनगाव) घनसावंगी तालूक्यातील (रा, ) मंठा तालूक्यातील (तळणी, ढोकसल, पांगरी) भोकरधन
तालूक्यातील (भोकरधन, पिंपळगाव, राजूर) जाफ्राबाद तालूक्यातील (महोरा, कुंभारझरी,
टेंभूर्णी)
छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील
छत्रपती संभाजी नगर तालूक्यातील (उस्मानपूरा, कांचनवाडी, चिट्टे पिंपळगाव, करमाड,
लाडसावंगी, कचनेर, पंढरपूर) पैठण तालूक्यातील (आडूल, बालानगर, नांदर, ढोरकीण,
पैठण, विहामांडवा, आप्पेगाव, निळा जळगाव) गंगापूर तालूक्यातील (गंगापूर, मांजरी,
शेंदूरवाडा, हरसूळ, डोणगाव, सिध्दनाथ, गजगाव, जामगाव) वैजापूर तालुक्यातील
(वैजापूर, खंडाळा, सिवूर, भोरसळ, गारज, लासूरगाव, लाडगाव, घैगाव, जानेफळ) कन्नड
तालूक्यातील (देवगाव, पिसोर, चिंचोली, करंजखेड) खुलताबाद तालूक्यातील (सुलतानपूर,
खूलताबाद) सिल्लोड तालूक्यतील ( सिल्लोड,
भार्डी, आमठाणा, बोरगाव, अंबाही, उडनगाव) सोयगाव तालूक्यातील (सोयगाव, सावल्डबरा,
बलोती, झारंडी) फुलंब्री तालूक्यातील (फुलंब्री, आळंद, फिरबावडा)
बीड जिल्हयतील बीड तालूक्यातील
(पाली, मांजरसुंबा, नेकनूर, लिंबागणेश,
यालमघाट) पाटोदा तालूक्यातील (पाटोदा, दसखेड, थेरला, अमळनेर) आष्टी तालूक्यातील
(धावलवडगाव) माजलगाव तालूक्यातील (गंगामसला) अंबेजोगाई तालूक्यातील (घाटनांदूर,
उजनी) केज तालूक्यातील (केज, होळ, चिंचोली माळी) परळी तालूक्यातील (धर्मापूरी)
शिरूर कासार तालूक्यातील (शिरूर, गोमालवाडा) इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी
करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
संदेश : शेतकरी
बांधवांनी पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
जमिनीत ओलावा व वापसा पाहून कापूस पिकाची लागवड करून घ्यावी. कोरडवाहू
बिटी कापूस पिकास 120:60:60 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी
शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 48 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
बागायती बिटी कापूस पिकास 150:75:75 किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति
हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो
पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते.
जमिनीत ओलावा व वापसा पाहून तूर पिकाची पेरणी करून घ्यावी. तूर
पिकास 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत
पेरून द्यावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते.
जमिनीत ओलावा व वापसा पाहून मुग/उडीद पिकाची पेरणी करून घ्यावी. मूग/उडीद
पिकास पेरणीच्यावेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद हेक्टरी मात्राद्यावी.
मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.
जमिनीत ओलावा व वापसा पाहून भूईमूग पिकाची पेरणी करून घ्यावी. भुईमूग
पिकास 20 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत
पेरून द्यावी. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते.
जमिनीत ओलावा व वापसा पाहून मका पिकाची पेरणी करून घ्यावी. मका
पिकास 150:75:75 किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतमात्रापैकी अर्धे नत्र
संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व 75 किलो नत्र पेरणीनंतर
एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नविन
लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा.
ढगाळ वातावरणामूळे आंबा बागेत पर्णगूच्छ रोगाची समस्या लक्षात
घेता, पावसाळ्यात आवश्यकतेनूसार दोन ते तीन वेळा रोगनाशकाची पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
द्राक्ष बागेत रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व शेंडा खूड करून
घ्यावी.
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या
जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड
करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले
असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची,
टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून
घ्यावी.
फुलशेती
पाउस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून
घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव
वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी
खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व
गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी,
गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात
दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून
काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात
जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 26/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
30.06.2026
No comments:
Post a Comment