Monday, 19 February 2024

मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 25 फेब्रुवारी ते 02 मार्च 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या  रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार  सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी व आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता,  फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

सध्या कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे उन्हाच्या तीव्रतेपासून पशुधनाच्या संरक्षणासाठी दूपारच्या वेळी जनावरे सावलीमध्ये बांधावीत.

सामुदायिक विज्ञान

रोजच्या आहारात 30 ग्रॅम पेक्षा जास्त साखर वापरू नये कारण जास्त साखरेमूळे जास्त कॅलरी मिळतात त्यामूळे वजन वाढते. वजन वाढल्यामूळे ऱ्हदयरोग आणि मधूमेह होण्याचा धोखा असतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक93/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 20.02.2024

 

 

 

Thursday, 15 February 2024

मराठवाडयात दिनांक 16 फेब्रूवारी रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची व त्यानंतर चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 16 फेब्रूवारी रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची  व त्यानंतर चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी व दिनांक 23 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास मध्यम जमिनीत 40 ते 50 दिवसांनी दूसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळकूजव्या रोगाने पिकाचे नूकसान होते. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास 65 ते 70 दिवसांनी पिक फुलोऱ्यात असतांना तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.  कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे) शिफारसीत खतमात्रा द्यावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. कमाल व किमान तापमानातील तफावत व मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तुती बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

सामुदायिक विज्ञान

बाळाला वयाच्या 6 महिन्यानंतरही मानेवर ताबा आला नसेल, ते तोंडातून कोणतेही आवाज काढत नसेल, सभोवतालच्या व्यक्तीकडे पाहून हसत नसेल अथवा त्यांना कोणताही प्रतिसाद देत नसेल. बाळाचे हात-पाय हे ताठ/कडक असतील अथवा शरीर सैल वाटत असेल तर तो बाळाच्या विकासाबाबत धोक्याचा संकेत असू शकतो. त्यामूळे त्वरीत कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक92/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 16.02.2024

 

 

 

Monday, 12 February 2024

मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील तीन दिवसात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील तीन दिवसात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 18 ते 24 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी, पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. नांदेड जिल्हयात वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. केळी व आंबा बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. नांदेड जिल्हयात वादळी वारा, पाऊस व गारपीटीमूळे प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.

फुलशेती

व्हॅलेंटाइन्स  डेमुळे बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

सध्याच्या अचानक होत असलेल्या वातावरण बदलामध्ये (सकाळी थंड तर दुपारी उष्ण वातावरण) या पासून लहान वयातील पशुधनाचे संरक्षण करणे महत्वाचे ठरते. मोठे पशुधन अनेक वेळा वातावरणातील बदलास सामोरे गेलेले असतात परंतू वासरे, करडे व कोकरे (नवीन जन्मास आलेली) हा बदल प्रथमत: अनुभवत आहेत. अशा सर्वांना सकाळी थंड दुपारी उन्हापासून संरक्षणाची काळजी घ्यावी. विशेषत: गोठ्यामध्ये संरक्षणा बरोबरच उर्जायूक्त आहार देणे आवश्यक आहे. जेणे करून ते आपल्या शरीराची उब कायम ठेवतात. परजीवी आजारांची  लागण होऊ नये यासाठी वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक व तिन महिन्यांच्या वासरांना व करडास/कोकरांना पट्टकृमीनाशक व रक्ती हागवण आजारावरील औषधीची मात्रा द्यावी. नांदेड जिल्हयात गारपीटीमूळे पशुधनास इजा झाली असल्यास लवकरात लवकर पशुवैद्यक तज्ञांकडून उपचार करून घ्यावेत.

सामुदायिक विज्ञान

रोजच्या आहारात 30 ग्रॅम पेक्षा जास्त साखर वापरू नये कारण जास्त साखरेमूळे जास्त कॅलरी मिळतात त्यामूळे वजन वाढते. वजन वाढल्यामूळे ऱ्हदयरोग आणि मधूमेह होण्याचा धोखा असतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक91/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 13.02.2024

 

 

 

Thursday, 8 February 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 फेब्रूवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 11 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 10 फेब्रूवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 09 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 10 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 11 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास मध्यम जमिनीत 40 ते 50 दिवसांनी दूसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळकूजव्या रोगाने पिकाचे नूकसान होते. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास 65 ते 70 दिवसांनी पिक फुलोऱ्यात असतांना तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड लवकरात लवकर करावी. हळद पिकाच्या काढणीपूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. उन्हाळी तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) किंवा 2.5 ग्रॅम थायरम किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया करावी. नंतर ॲझॅटोफॉस 20 मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे) शिफारसीत खतमात्रा द्यावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

पुढील आठवड्यात असलेल्या व्हॅलेंटाइन्स  डेमुळे बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कीटक संगोपन गृहात 22 ते 28 सें.ग्रे. ठेवावे तर आर्द्रता 80 ते 85 % ठेवावी. हिवाळ्यात 20 सें.ग्रे.च्या खाली किंवा उन्हाळयात 35 सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक तुती पाने खात नाहित व कोष करण्याची क्रिया मंदावते. म्हणून संगोपन गृहात तापमापी इलेक्ट्रॉनिक यंत्र असावे. ज्यात आर्द्रता पण मापण करता येते. हिवाळयात व उन्हाळयात मराठवाडा विभागात आर्द्रता खूपच कमी राहते म्हणून हयुमीडी फायर कम हिटरचा वापर करावा. हिवाळयात कोळशाच्या किंवा इलेक्ट्कि शेगडीच्या साहाय्याने संगोपन गृहातील तापमानात वाढ करता येते. उन्हाळयात छतावर तुषार सिंचनाची व्यवस्था करावी. त्यासाठी 1000 लिटर पाण्याची टाकी व एक एचपी इलेक्ट्रिक मोटारची व्यवस्था करावी. बाजूच्या शेडनेटवर गोणपाट आच्छादन करून लॅटरलच्या साहाय्याने पाणी सोडून संगोपन गृहातील आर्द्रतेत वाढ करता येते.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे.  

सामुदायिक विज्ञान

पपई आणि पेरूमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व “अ” आणि “क” असून ही फळे तंतूमय पदार्थ तसेच अँटिऑक्सिडंटसचा उत्कृष्ट स्त्रोत असल्याने त्यांचे सेवन करणे उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक90/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक 09.02.2024

 

 

 


Monday, 5 February 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसारमराठवाडयात दिनांक 09 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 09 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात दिनांक 07 व 08 ‍फेब्रुवारी रोजी 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 09 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सारासिपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 11 ते 17 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 09 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी लवकरात लवकर पूर्ण करावी. उन्हाळी भुईमूग पिकात पेरणी पूर्वी पुढील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. i. थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे. ii. प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. प्रतयेकी 250 ग्राम किंवा द्रव स्वरूपात असेल तर प्रत्येकी 60 मिली.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत पोटॅशियम 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. फुलधारणा अवस्थेत असलेल्या आंबा फळ बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारणी करू नये. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड 200 मिली ग्रॅम प्रति 10 लिटर द्रावणात बूडवावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पुढील आठवड्यात असलेल्या व्हॅलेंटाइन्स  डेमुळे बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

पशुधन व्यवस्थापन

पशुप्रजननाची क्रिया कालवडी, वगारीत सुरू होणे म्हणजेच जनावर माजावर येणे वयात येणे किंवा प्रजन सक्षम होणे. पशु प्रजनन संस्थेची वाढ जन्मानंतर वासराच्या वाढीशी संबंधीत असते. ज्या वासरात शरिरीक वाढीचा वेग जास्त ती वासरे लवकर वयात येतात कारण त्यांच्या प्रजनन संस्थेची वाढ ही लवकर पुर्ण होते. या उलट ज्या वासरात वाढीचा दर कमी असतो त्यांची प्रजनन संस्था लवकर तयार होत नाही व ते उशीरा माजावर येतात.

सामुदायिक विज्ञान

पपई आणि पेरूमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व “अ” आणि “क” असून ही फळे तंतूमय पदार्थ तसेच अँटिऑक्सिडंटसचा उत्कृष्ट स्त्रोत असल्याने त्यांचे सेवन करणे उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक89/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 06.02.2024

 

 

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 सप्टेंबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, लातूर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 08 ते 10 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी तर ‍दिनांक 11 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील तीन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...