Friday, 16 June 2023
दिनांक 17 जून रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 18 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी औरंगाबाद,जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार
नाही. दिनांक 17
जून रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 18 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड,
परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी औरंगाबाद,जालना, बीड जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 जून 2023 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी व दिनांक 23 ते 29 जून
2023 दरम्यान
पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय
व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला
आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 जून 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी
राहण्याची शक्यता आहे.
अद्याप
मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नसून दिनांक 16 ते 22 जून, 2023 दरम्यान तूरळक
ठिकाणी मान्सून पूर्व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी. अंतरावर व
2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे
वापरावे. सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो
बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची
सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45
सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते
4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित व 10 किलो सुधारीत
वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता
येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी
करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4
किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 15 जुलै पर्यंत करता
येते. ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ऊस पिकास सकाळी लवकर
किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती
करन घ्यावी व पक्की बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश
प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड लवकरात लवकर करून घ्यावी.
लागवडीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येऊ शकते. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या
तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये
पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन संत्रा/मोसंबी,डाळींब व चिकू
लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत.
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. संत्रा/मोसंबी,डाळींब
व चिकू बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. संत्रा/मोसंबी,डाळींब व
चिकू बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन
करावे.
चारा पीके
मका या चारापिकाची पेरणी 30X45 सेंमी अंतरावर
करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 40 ते 45 किलो बियाणे वापरावे.
भाजीपाला
बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी
आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी
आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबू नये.
तुती रेशीम उद्योग
तुती लागवड केल्या नंतर दूसऱ्या वर्षात
जून महिन्यात आठ ते दहा महिने वयाची झाडे बेणे म्हणून छाटणी करून विक्री करता
येतात, किंवा स्वत:च लागवड क्षेत्र वाढवायचे असेल तर तुती रोप वाटीका तयार
करण्यासाठी वापरता येईल. छाटणी जमिनीलगत न करता 1.25 फुट उंचीवरून करावी म्हणजे नंतर येणाऱ्या 4 ते 5
फांद्या पासून वर्षभर व पुढील 2-3 वर्षाकरिता तुती पानाचे उत्पादन मिळेल. परिपक्व तुती
पाने उत्पादनासाठी हे आवश्यक आहे. त्याचबरोबर उच्च प्रतिच्या तुती पाने
उत्पादनासाठी शेणखत 20 मे.टन/हे./वर्ष म्हणजे 8 टन प्रति एकर दोन समान हप्त्यात 4
टन जून व 4 टन नोव्हेंबर महिन्यात द्यावा. किंवा 5 टन गांडूळ खत / हेक्टरी म्हणजे
2 टन/प्रति एकर दोन समान हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात तुती बागेस द्यावा.
सामुदायिक
विज्ञान
उन्हाळ्यात शेतात काम करतांना डोक्याला
संरक्षण देण्याच्या दृष्टीने सुती कपडाचा रूमाल किंवा गमछा गुंडाळणे गरजेचे असते.
ईतर
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील
पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी
गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट
कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 22/2023
- 2024 शुक्रवार, दिनांक – 16.06.2023
Tuesday, 13 June 2023
दिनांक 17 जून रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी
तफावत जाणवणार नाही. दिनांक 17 जून
रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला
आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 18 ते 24 जून 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा
जास्त व
किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
दिनांक 13 ते 16 जून, 2023 दरम्यान तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बीटी
कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद
ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास
फायदेशीर ठरते. तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी
तुर + बाजरी (2:4), तुर + ज्वारी (3:3 किंवा 2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2
किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक
फायदा होतो. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते या
पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता
येतात. भुईमूग पिकात भूईमूग + तूर (4:2) किंवा भुईमूग + तीळ (4:2) किंवा भूईमूग +
एरंडी (4:1) याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. मका पिकात मका + तूर (4:2) किंवा मका + उडीद (2:1)
या प्रमाणे आंतरपीक घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन
केळी, आंबा व सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती
पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी
करावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. केळी, आंबा द्राक्ष व सिताफळ बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी, आंबा द्राक्ष व सिताफळ बागेत
ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष
बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश
डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते.
भाजीपाला
पाण्याची
उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार
करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी
आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची
उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी
टाकून रोपे तयार करावी. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार
झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळा
ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी
त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून
संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा
म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली
औषधोपचार लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच
तात्काळ शेळी मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची
जंतनाशकाची मात्रा आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मधूमेह
असणाऱ्या व्यक्तींनी रोजच्या आहारात तंतूमय युक्त अन्न पदार्थांचा जसे की, भगर,
बाजरी, नाचनी, राजमा, चवळी, मटकी, सोयाबीन, मेथीची भाजी, राजगिऱ्याची भाजी आणि
शेवग्याची पाने यांचा वापर करावा. त्यामूळे रक्तातील वाढणारी साखर नियंत्रित
राहण्यास मदत होते.
ईतर
शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी
सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात
कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 21/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 13.06.2023
Friday, 9 June 2023
दिनांक 09 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड व नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 09 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड व नांदेड जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 09 ते 15 जून 2023 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 16 ते 22 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीपेक्षा
जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे
तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
सध्याचा होणारा पाऊस हा पूर्व मौसमी
पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तुर हे
आंतरपीक 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे
आंतरपीक 1:1 किंवा 2:1 या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी
पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. आंतरपीक पध्दतीमध्ये
खरीप ज्वारी + सोयाबीन 2:4 किंवा 3:6 या प्रमाणात दोन ओळीतील अंतर 45 सेंमी
ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तुर 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात आंतरपीक घेता येते.
सोयाबीन, मुग, उडीद ही कमी कालावधीची पिके आंतरपीके म्हणून घेताना 2:4 या आंतरपीक
पध्दतीचा अवलंब करावा. खरीप ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली
नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. बाजरी पिकामध्ये बाजरी + तुर हे आंतरपीक 2:1,
3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. बाजरी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे
केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. ऊस पिकास पाण्याचा ण बसणार नाही याची
काळजी घ्यावी. ऊस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याची
उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये आंतरपीके घेताना
पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत.
यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन फळ बाग लागवडीसाठी घेतलेले खड्डे
अर्धा किलो सुपर फॉस्फेट, तिन ते चार घमेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत मातीत मिसळून
खड्डे भरावेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा. नविन
लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड
केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर
किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
चारा पीके
मका या चारापिकाच्या लागवडीसाठी
आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगासफेद, विजय इत्यादी जातींची निवड करावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला
(वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी
टाकावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची
उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. तुरळक
ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40
किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी
करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक
आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक
सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक
सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची
लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी
मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा
आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबू नये.
तुती रेशीम उद्योग
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतीची
बेण्यापासून लागवड केली असेल अशा शेतात मोठया प्रमाणावर 20-25 % पर्यंत तुट राहते.
मनरेगा योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षात 90 टक्के झाडांची संख्या असणे आवश्यक आहे
त्यामुळे तुतीची लागवड बेण्याएवजी 3 महिने वयाच्या रोपांपासून करण्याची महाराष्ट्र
शासनाने सक्ती केली आहे. लागवउ केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे
मरण्याचे प्रमाण नगण्य राहते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन अपेक्षित तुती
पानांचे उत्पादन मिळते.
सामुदायिक
विज्ञान
हाडाच्या मजबुतीसाठी कॅल्सीयम युक्त
अन्नपदार्थ नियमित घ्यावेत, उदा. दूध व दूधाचे पदार्थ, शेवग्याची पाने, फुलकोबीची
पाने, नाचणी, बीट, हरभऱ्याची पाने, चमकुरा, कडीपत्ता, तीळ इत्यादी.
ईतर
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील
पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी
गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट
कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 20/2023
- 2024 शुक्रवार, दिनांक – 09.06.2023
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशि...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...



