Tuesday, 17 October 2023

मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ते 28 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात परतीच्या पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकात बाह्य बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 25% ईसी  200 मिली किंवा प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 500 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन 20 % डब्ल्यूजी  200 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकात अंतर्गत बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 500 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून  फवारावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.  तूर पिकात फायटोप्थोरा ब्लाइट रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सची 200 ग्रॅम/200 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त भागामध्ये आळवणी करावी. फुलोरा अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.  खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी सुर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. भारी जमिनीत पेरणी 60X30 सेंमी तर मध्यम जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील सात दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या केळी बागेत तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. केळी बागेत प्रति झाड 50 ग्रॅम पोटॅश खत मात्रा द्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेत कुकुम्बर मोझॅक विषाणू ग्रस्त रोपे दिसून आल्यास उपटून नष्ट करावीत.  पुढील सात दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  छाटणी केली नसल्यास द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे.  पुढील सात दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

पुढील सात दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून  आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

पुढील सात दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नवरात्री व दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सामुदायिक विज्ञान

पीक कापणी आणि मळणी करतांना शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे, श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 57/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 17.10.2023

Friday, 13 October 2023

मराठवाडयात पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढली तीन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी उत्तर मराठवाडयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढली तीन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी उत्तर मराठवाडयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर दिनांक 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 18 ते 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात परतीच्या पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व लवकर पकव होणाऱ्या सोयाबीनच्या जाती काढणीस तयार असल्यास स्वच्छ हवामानात पिकाची वेळेवर काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसत असल्यास हलके पाणी द्यावे.  पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या बाजरी पिकाची काढणी करून घ्यावी. पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 200 मिली किंवा प्रोपिकोनॅझोल 25% 200 मिली  किंवा क्लोरथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हरभरा पिकाच्या पेरणीसाठी बीडीएनजी-9-3, बीडीएनजी-797 (आकाश), दिग्विजय, जाकी-9218, साकी-9516, फुले विक्रम, फुले विक्रांत, पीडीकेव्ही कांचन, विश्वास इत्यादी वाणांपैकी निवड करावी. करडई पिकाच्या पेरणीसाठी शारदा, परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40 (निम काटेरी), अन्नेगीरी-1, एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी निवड करावी. गहू पिकाच्या उत्तम वाढीसाठी सुपिक जमिन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असावा. कोरडवाहू गव्हाच्या लागवडीसाठी ओलावा  टिकवून ठेवणाऱ्या जमिनीची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी व डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी व डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळकुज होऊ नये म्हणून फळ काढणीपूर्वी एक आठवडा 0.1 % बावीस्टीनची फवारणी करावी. काढणीपश्चात फळे 1% बावीस्टीनच्या द्रावणात बूडवून घ्यावीत. फळ काढणीनंतर बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

भाजीपाला

पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

पुढील काळात नवरात्री व दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक (बॉम्बॅक्स मोरी) परिपक्व वाढ झाल्यावर या 15 व्या वाढीच्या अवस्थेत जातात. याच अवस्थतेत उझीमाशी प्रादुर्भाव करते. रेशीम किटकावर ग्रासरी, फ्लॅचरी व मस्करडीन रोगाच्या प्रादूर्भावामूळे 30 टक्के पर्यंत कोष पिकाचे नुकसान होते व उझी माशीच्या प्रादुर्भावामूळे 20 टक्के पर्यंत नुकसान होते. हे टाळण्यासाठी केलेले उपाय म्हणजेच नियंत्रण होय. कच्च्या शेडनेटचे हळू हळू पक्क्या संगोपन गृहात रूपांतर करणे. सरळ तुती फांद्या संगोपन शेडमध्ये आनून खाद्य न देणे. उझी नाश, उझी साईड व जैविक नियंत्रण करण्यासाठी उझी ट्रॅप आणि निसोलायनेक्स थायमस 2 पाऊच प्रति 100 अंडीपुज या प्रमाणे रॅकला लावणे. शेडमधिल उझी माशीचा प्रवेश थांबवणे. सर्व किटक विष्ठेसोबत उझी माशीचे कोष गोळा करून सील बंद करणे. विष्ठा खताच्या पोत्यात बांधून 25 दिवस ठेवणे तरच उझी माशीचे नियंत्रण मिळवता येईल.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सामुदायिक विज्ञान

उत्तम मानसिक स्वास्थ्य असणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे  प्रत्येकाने स्वतःच्या  मानसिक स्वास्थ्याच्या जपणुकीसाठी आपल्या जीवनात व्यायाम, योग ध्यान, संतुलित आहार, शारीरिक काम, खेळ, इतरांशी परस्पर जिव्हाळ्याचे संबंध, दयाळूपणा, कृतज्ञतेची भावना, सकारात्मक वृत्ती, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, ध्येय, विधायक कार्यात सहभाग, संगीत-कला या सारख्या क्षेत्रात आवड, छंद जोपासना, विनोदबुद्धी, पुरेशी  विश्रांती व झोप अशा निरोगी  जीवनशैलीचा अवश्य अंगीकार करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 56/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 13.10.2023

Tuesday, 10 October 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 ते 14 आक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 15 ते 21 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात परतीच्या पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकात बाह्य बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 25% ईसी  200 मिली किंवा प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 500 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन 20 % डब्ल्यूजी  200 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकात अंतर्गत बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 500 ग्रॅम प्रति एकर  फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून  फवारावे. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. तूर पिकात फायटोप्थोरा ब्लाइट रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सची 200 ग्रॅम/200 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त भागामध्ये आळवणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी शक्ती (पीव्हीके-1009), परभणी  मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती (एसपीव्ही-1595/सीएसव्ही-18), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-22 आर, सीएसव्ही-29आर (एसपीव्ही-2033), मालदांडी (एम35-1), फुल रेवती (एसपीव्ही-2048), फुले सुचित्रा इत्यादी वाणांपैकी निवड करावी. रब्बी सुर्यफुल पेरणीसाठी एल.एस.एफ.एच-171, एल.एस.एफ.एच-35, के.बी.एस.एच-44, डी.आर.एस.एच-1, एल.एस.एफ-8, एल.एस-11, एल.एस-2038 इत्यादी वाणापैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील पाच दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या केळी व सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेत कुकुम्बर मोझॅक विषाणू ग्रस्त रोपे दिसून आल्यास उपटून नष्ट करावीत.  पुढील पाच दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे. द्राक्ष छाटणीच्या पंधरा ते वीस दिवस आधी जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट किंवा सोडियम  किती प्रमाणात आहे यावर अवलंबून, सल्फर/जिप्सम, शेणखत/कम्पोस्ट खत ईत्यादींसह माती दुरूस्ती म्हणून वापरावे. ते जमिनीवर न सोडता जमिनीत मिसळावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

पुढील पाच दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

पुढील पाच दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सामुदायिक विज्ञान

उत्तम मानसिक स्वास्थ्य असणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे  प्रत्येकाने स्वतःच्या  मानसिक स्वास्थ्याच्या जपणुकीसाठी आपल्या जीवनात व्यायाम, योग ध्यान ,संतुलित आहार ,शारीरिक काम , खेळ ,इतरांशी परस्पर जिव्हाळ्याचे संबंध,दयाळूपणा, कृतज्ञतेची भावना, सकारात्मक वृत्ती, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा,ध्येय ,विधायक कार्यात सहभाग,संगीत-कला या सारख्या क्षेत्रात आवड , छंद जोपासना  ,विनोदबुद्धी ,पुरेशी  विश्रांती व झोप अशा निरोगी  जीवनशैलीचा अवश्य अंगीकार करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 55/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 10.10.2023

Friday, 6 October 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 06 ते 12 आक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 06 ते 12 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे तर दिनांक 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 11 ते 17 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात परतीच्या पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, शेंगा पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 60 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लँम्बडा सायहँलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - 50 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90 % - 170 मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 % + लँम्बडा सायहँलोथ्रिन 4.6 %- 80 मिली (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% - 100 ते 120 मिली यापैकी कुठलेही एक कीटकनाशक प्रती एकर याप्रमाणात फवारावे. शक्य असल्यास उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकातील उपटतण करून घ्यावे, जेणेकरून रब्बी हंगामात होणाऱ्या तणांचा प्रादूर्भाव कमी होईल. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या व लवकर पकव होणाऱ्या सोयाबीनच्या जाती काढणीस तयार असल्यास स्वच्छ हवामानात पिकाची वेळेवर काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे. उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  उशीरा पेरणी केलेल्या बाजरी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 200 मिली किंवा प्रोपिकोनॅझोल 25% 200 मिली  किंवा क्लोरथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे पाण्यात मिसळून फवारणी करावी.  जेथे शक्य आहे तेथे हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. जेथे शक्य आहे तेथे करडई पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. हमखास पावसाच्या भागात करडई पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर पर्यंत करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळकुज होऊ नये म्हणून फळ काढणीपूर्वी एक आठवडा 0.1 % बावीस्टीनची फवारणी करावी. काढणीपश्चात फळे 1% बावीस्टीनच्या द्रावणात बूडवून घ्यावीत. फळ काढणीनंतर बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. नविन लागवड केलेल्या डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. रब्बी हंगामाकरिता लागणाऱ्या भाजीपाला पिकांच्या बियाण्याची गादी वाफ्यावर पेरणी केली नसल्यास पेरणी लवकरात लवकर करावी. भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामूळे, काकडीवर्गीय पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास क्लोरोथॅलोनिल 75% डब्ल्यूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक (बॉम्बॅक्स मोरी) परिपक्व वाढ झाल्यावर या 15 व्या वाढीच्या अवस्थेत जातात. याच अवस्थतेत उझीमाशी प्रादुर्भाव करते. रेशीम किटकावर ग्रासरी, फ्लॅचरी व मस्करडीन रोगाच्या प्रादूर्भावामूळे 30 टक्के पर्यंत कोष पिकाचे नुकसान होते व उझी माशीच्या प्रादुर्भावामूळे 20 टक्के पर्यंत नुकसान होते. हे टाळण्यासाठी केलेले उपाय म्हणजेच नियंत्रण होय. कच्च्या शेडनेटचे हळू हळू पक्क्या संगोपन गृहात रूपांतर करणे. सरळ तुती फांद्या संगोपन शेडमध्ये आनून खाद्य न देणे. उझी नाश, उझी साईड व जैविक नियंत्रण करण्यासाठी उझी ट्रॅप आणि निसोलायनेक्स थायमस 2 पाऊच प्रति 100 अंडीपुज या प्रमाणे रॅकला लावणे. शेडमधिल उझी माशीचा प्रवेश थांबवणे. सर्व किटक विष्ठेसोबत उझी माशीचे कोष गोळा करून सील बंद करणे. विष्ठा खताच्या पोत्यात बांधून 25 दिवस ठेवणे तरच उझी माशीचे नियंत्रण मिळवता येईल.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सामुदायिक विज्ञान

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला लगेच अंघोळ घालणे त्याच्या स्वास्थ्यासाठी धोकादायी असल्याने कुटुंबियांनी त्याला सुरुवातीच्याय 6 तासात अंघोळ घालणे पूर्णत: टाळून पुढील 24 तासानंतर डॉक्टरी सल्ल्यानूसार अंघोळ घालावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 54/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 06.10.2023