Tuesday, 28 September 2021
दिनांक 28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार, खूप जोरदार ते अत्यंत जोरदार तर उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तर जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 28 सप्टेंबर
रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,
विजांच्या कडकडाटासह जोरदार, खूप
जोरदार ते अत्यंत जोरदार तर उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार ते खूप
जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची
तर जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान
सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील आठवडयात झालेला पाऊस व पुढील
पावसाचा अंदाज लक्षात घेता कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी. कापूस पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज
लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस
व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता तूर पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी. तूर पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज
लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.पावसाचा अंदाज लक्षात घेता
काढणी केलेल्या मुग/उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.मागील आठवडयात
झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता भूईमूग पिकात पाणी साचून राहणार
नाही याची दक्षता घ्यावी. भूईमूग पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून
द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात
झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता मका पिकात पाणी साचून राहणार नाही
याची दक्षता घ्यावी. मका पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
मागील आठवडयात झालेला पाऊस व पुढील
पावसाचा अंदाज लक्षात घेता केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
केळी बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात
घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस व
पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता आंबा बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.मागील आठवडयात झालेला
पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता द्राक्ष बागेत पाणी साचून राहणार नाही
याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. मागील
आठवडयात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता सिताफळ बागेत पाणी साचून
राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून
द्यावे.
भाजीपाला
मागील आठवडयात झालेला पाऊस व पुढील
पावसाचा अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी. भाजीपाला पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.
फुलशेती
मागील आठवडयात झालेला पाऊस व पुढील
पावसाचा अंदाज लक्षात घेता फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
फुल पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
व तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा
बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबु नये. सध्या पशूधनामध्ये आतडयामधील सिस्टोझोमोसीस या आजाराची लागण
होत आहे. रक्त विष्ठेद्वारे बाहेर पडणे अथवा रक्तयूक्त विष्ठा (शेण), भूक मंदावणे
ही प्रमूख लक्षणे दिसून येतात. तळयाकाठी गोगलगायींचे वाढते प्रमाण या रोगाच्या
प्रसारास कारणीभूत ठरते. म्हणून पशूधनामध्ये रक्ती हगवण आढळल्यास तळयाकाठी चरावयास
अथवा त्या तळयाचे पाणी पाजण्यासाठी प्रतिबंधीत करावे तसेच पशूवैद्यक तज्ञांकडून
प्राझीक्वेन्टॉल सारख्या कृमीनाशकाचा औषधोपचार करून घ्यावा.
सामुदासिक विज्ञान
भाजी, वरण, भाकरी किंवा सूप करताना,
वाळलेल्या शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले यांची पावडर वापरून लोह, जीवनसत्व क,
अँटीऑक्सीडंट भरपूर प्रमाणात मिळवा आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढवा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 52/ 2021 -
2022 मंगळवार, दिनांक – 28.09.2021
Friday, 24 September 2021
दिनांक 24 सप्टेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी लातूर, परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 सप्टेंबर रोजी बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 सप्टेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी लातूर, परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 सप्टेंबर रोजी बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 सप्टेंबर
ते 05 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्ष कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील
पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज
लक्षात घेता फवारणी पूढे ढकलावी.मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच
दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार खरीप ज्वारी पिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणी पूढे ढकलावी.मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच
दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बाजरी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता
घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. मागील काही दिवसात
झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार ऊस पिकात पाणी साचून
राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून
द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी.मागील
काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार हळद पिकात
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी पूढे ढकलावी. पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी.
फळबागेचे व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील
पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचून राहणार नाही
याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. मागील काही दिवसात झालेला
पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार डाळींब बागेत पाणी साचून राहणार
नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. मागील काही
दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार चिकू बागेत पाणी
साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी.
भाजीपाला
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील
पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.
फुलशेती
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील
पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
चारा पिके
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील
पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार चारा पिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या
अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर
100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास
होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी.
पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर
शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे
गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे
कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया
संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया
कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता
असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ
रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.
सामुदायिक विज्ञान
फळे भाज्या प्रक्रिया करून वाळवल्यास
त्यांचा रंग, गंध आणि चव टिकून राहते. बाजारात फळे भाज्यांचे भाव कमी झाल्यानंतर
निर्जलीकरन करून मुल्यवर्धनातून चांगला फायदा मिळवता येतो.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 51 / 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक 24.09.2021
Tuesday, 21 September 2021
दिनांक 21 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच दिनांक 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूढील पाच दिवसात जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात हलका ते मध्यम तर औरंगाबाद व नांदेड जिल्हयात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 21 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्हयात तर
दिनांक 22 सप्टेंबर रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच दिनांक 23 सप्टेंबर रोजी औरंगाबाद
व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूढील
पाच दिवसात जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात हलका ते मध्यम
तर औरंगाबाद व नांदेड जिल्हयात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर,
2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कापूस पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत
देणे ही कामे पूढे ढकलावीत.पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता तूर पिकात
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तूर पिकात साचलेले अतिरीक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत देणे ही कामे
पूढे ढकलावीत.पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या मुग/उडीद पिकाची सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता भूईमूग पिकात
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भूईमूग पिकात साचलेले अतिरीक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.पुढील
तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता मका पिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी. मका पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता केळी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. केळी बागेत साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी करणे, खत
देणे ही कामे पूढे ढकलावीत.पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता आंबा
बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे.पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता द्राक्ष
बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे. पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता सिताफळ बागेत
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरीक्त पाणी
शेताबाहेर काढून द्यावे.
भाजीपाला
पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज
लक्षात घेता भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला
पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी
करणे, खत देणे ही कामे पूढे ढकलावीत.
फुलशेती
पूढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात
घेता फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून
घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
व तुरळक ठिकाणी जोरदार पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा
बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबु नये. पशूधनाचे शिंग बुडापाशी नरम पडणे, वाकडे होणे, शिंग वारंवार घासणे,
खाजवणे, शिंगाला छिद्र पडणे किंवा शिंगामधून घाण वास/द्रव येणे. ही वरील लक्षणे
शिंगाच्या कर्करोगाची असून तात्काळ पशूवैद्यक तंज्ञाकडून शल्यचिकीत्सा करून
घ्यावी.
सामुदासिक विज्ञान
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी
मैदानी खेळ लाभदायी असल्याने पालकांनी त्यांना यासाठी प्रोत्साहीत करावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 50/ 2021 -
2022 मंगळवार, दिनांक – 21.09.2021
Friday, 17 September 2021
दिनांक 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2021 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्हयात खूप
हलका ते हलक्या तर औरंगाबाद, जालना, परभणी, जिल्हयात हलक्या स्वरूपाचा तर नांदेड व
हिंगोली जिल्हयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2021 दरम्यान
कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील
पानावरील ठिपके व शेंगा करपाच्या व्यवस्थापनासाठी टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65%
डब्ल्यूजी 25 ग्राम प्रति 10 लिटर पाणी किंवा टेब्यूकोनॅझोल 25.9% 12.5 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या
सोयाबीन पिकावरील उंट अळी व तंबाखूवरील
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली किंवा
प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 15.8 एससी 3 मिली किंवा
थायमिथोक्झाम 12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन
9.5 झेडसी 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के +
लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी
करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक
पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली
किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
हळदीच्या पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2%
+ डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली
स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने
क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत
अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जर बागेत
अधीपासूनच तेलकट डाग रोगाचा प्रादूर्भाव असेल तर स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन
हायड्रोक्लोराईड 10% (स्ट्रेप्टोसायक्लीन) 0.5 गॉम प्रति
लिटर हे महिन्यातून एकदा आणि त्यानंतर 7-10 दिवसाच्या अंतराने ब्रोनोपॉल फवारावे.
तेलकट डागाच्या जिवाणूमध्ये 0.5 ग्राम प्रति लिटरपेक्षा कमी मात्रेला प्रतिकार
शक्ती निर्माण झाल्यामूळे शिफारशीपेक्षा कमी मात्रा वापरून फवारणी केल्यास रोग
नियंत्रणात येत नाही. चिकू बागेत तणांचे
व्यवस्थापन करावे.
भेंडी पिकावरील फळपोखरणाऱ्या अळीच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एस सी 2.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 25%
ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास
फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.
फुलशेती
गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना
अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व
प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या
अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर
100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास
होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी.
पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर
शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे
गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे
कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया
संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया
कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता
असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ
रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.
सामुदायिक विज्ञान
बालकांच्या डोळयात काजळ घालणे हानिकारक
असल्याने कुटुंबियांनी त्याचा वापर करणे टाळावे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 49 / 2021 - 2022 शुक्रवार, दिनांक 17.09.2021
Tuesday, 14 September 2021
दिनांक 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 सप्टेंबर
ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान
सरासरीएवढे राहण्याची,
किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर
पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पावसामूळे कापूस पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. कापूस पिकात जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% 25 ग्रॅम + स्ट्रेपटोसायक्लीन 2 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात आकस्मिक मर विकृतीचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत
शेताबाहेर काढून द्यावे वापसा येताच लवकरात लवकर 1.5 किलो यूरीया + 1.5 किलो पालाश (पोटॅश) + 250
ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 100 लिटर
पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 150 मिली आळवणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल 5% 30 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7% 8 मिली किंवा बूप्रोफेंझीन
25% 20 मिली किंवा फलोनिकॅमिड
50% 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. कापूस पिकात फुलगळ दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी नॅपथेलीन ॲसिटीक ॲसिड (एन ए ए ) 2.5 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. पावसामूळे तूर पिकात
साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी
करावी. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकात साचलेले पाणी चर काढून त्वरीत शेताबाहेर
काढून द्यावे वापसा येताच लवकरात लवकर मेटालॅक्झील 4% +
मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी
25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावार पावसाने
उघाड दिल्यास फवारणी करावी.पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मुग/उडीद पिकाची मळणी करावी
व मळणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.पावसामूळे भूईमूग पिकात
साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.पावसामूळे मका पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
पावसामूळे केळी बागेत साचलेले अतिरीक्त
पाणी बागेबाहेर काढून द्यावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम
50 डब्ल्यू पी 10 ग्राम किंव प्रोपीकोनॅझोल
10 % ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. पावसामूळे आंबा बागेत साचलेले
अतिरीक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे.पावसामूळे द्राक्ष बागेत साचलेले अतिरीक्त
पाणी बागेबाहेर काढून द्यावे. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने व फांद्या गोळा करून
नष्ट कराव्यात. द्राक्ष बागेत ऑक्टोंबर छाटणीची पूर्व तयारी करावी.पावसामूळे
सिताफळ बागेत साचलेले अतिरीक्त पाणी बागेबाहेर काढून द्यावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम
लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
भाजीपाला
पावसामूळे भाजीपाला पिकात साचलेले
अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. भेंडी पिकावरील फळपोखरणाऱ्या अळीच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एस सी 2.5 मिली किंवा क्विनॉलफॉस 25%
ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास
फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत
पाठवावीत.
फुलशेती
पावसामूळे फुल पिकात साचलेले अतिरीक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे. सध्या गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक
मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व प्रतवारी
करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गारवर्गीय
व म्हैसवर्गीय पशूधनात दिसून येत आहे. हा साथीचा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार
मूख्यत्वे रक्त पिपासू चावणऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यामूळे होतो. याच्या
व्यवस्थापनासाठी रोग बाधीत पशुधन निरोगी
पशुधनापासून विलगीकरण करावे अथवा त्यांना एकत्रित चरावयास सोडू नये. रोगबाधीत
पशुधनाची ने आण बंद करावी. तसेच साथीच्या काळात गावातून/परिसरातून गोठयास भेटी
देणाऱ्याची संख्या मर्यादीत करावी. बाधीत पशुधनाची सुश्रुषा करणाऱ्य पशुवैद्यक
डाफक्टरांनी विशिष्ट पोशाख परिधान करावा व सुश्रूषेनंतर हात अल्कोहोत मिश्रीत
सॅनीटायझरने धूवून टाकावेत तसेच पादत्राने व पोशाख, गरम पाण्याने निर्जंतूक करून
घ्यावा. बाधीत पशुधनाच्या संपर्कामध्ये आलेले वाहन व परिसर तसेच ईतर साहीत्य निर्जंतूक करावे. रोग
नियंत्रणासाठी रक्त पिपासू चावणाऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यांचे निर्मुलन
करावे. पशुधन व परिसरावरती रासायनिक/वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.
सामुदासिक विज्ञान
पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा,
स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके,
दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 48 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 14.09.2021
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...