Tuesday, 29 November 2022
Monday, 28 November 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 02 ते 08 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला तर
जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या
झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या
अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या
वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क
किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या तूर
पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन
कोळपण्या आणि एक खुरपणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. रब्बी मका पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे.
पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75
किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक
महीण्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 + युरिया 100 किलो किंवा 500 किलो
15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया 163 किलो + 469 किलो सिंगल सुपर
फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो
युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावा. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर 25 ते 30
दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा 87 किलो यूरिया
प्रति हेक्टरी द्यावा. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी सूर्यफुल पिकास आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी
करावी. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते.
गव्हाची पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो किंवा 87 किलो
डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 87 किलो
युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी
खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25
ते 30 दिवसांनी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस प्रति झाड 50 ग्रॅम पोटॅशियम द्यावे. केळी बागेस
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा
थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. द्राक्ष घड 10 पिपिएम जिब्रॅलिक ॲसिडच्या
द्रावणात बूडवावेत. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणी न केलेल्या
सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा
प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल
10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी.
200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची
काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.
पशुधन
व्यवस्थापन
लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव वासरांपर्यंत पोहचत आहे, तरी
वासरांना लसीकरण करण्यापूर्वी किमान पाच दिवस अगोदर पशुवैद्यक तज्ञांच्या मार्फत
जंतनाशकाची मात्रा द्यावी. लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव नवीन नवीन गोवंशीय
पशुना होत आहे यासाठी (अ) ज्या पशुना लस द्यावयाची राहीली असेल त्यांना लस देऊन
घ्यावी. (ब) संपूर्ण विलगीकरण अत्यंत महत्वाचे आहे बाधीत व अबाधीत पशुंना एकमेकापासून
दूर अंतरावर बांधावे. (क) गोठ्याची स्वच्छता यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे (ड)
गोठ्यामध्ये फवारणी व किटकवर्गीय माशांचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठीच्या उपाय
योजना कराव्यात.
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया
तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड
वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब
लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.
सामूदायीक विज्ञान
काम करतांना वारंवार उठ-बस करण्यामूळे व्यक्तींच्या स्नायुंवर ताण
येऊन थकवा येतो.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 70/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
29.11.2022
Friday, 25 November 2022
Thursday, 24 November 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर व दिनांक 02 ते 08 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला तर
जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
जोमदार वाढीसाठी हरभरा पिक
सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली
कोळपणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा
क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5%
4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात
उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी
करावी व दोन रोपातील अंतर 20 सेंमी ठेवावे. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा
असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक
ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्याव. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा यांच्या
व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% एससी 10 मिली किंवा
बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी
करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या
अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
15 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस
लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26 किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो
म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया +
531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा
द्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा
इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त
फांद्या काढून नष्ट कराव्यात. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मिरची पिकावर सध्या
फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम
किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5%
एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी
करावी.
तुती रेशीम
उद्योग
शेणखत किंवा कम्पोस्ट खतापेक्षा जास्त
अन्न घटक कोंबडी खत किंवा शेळी-मेंढीच्या खतात असतात. तुती बागेस कोंबडी खत चांगले
कुजवून वापरता येते. भात पेंढा सोबत काथ्या किंवा क्लोरेटस साजर काजू या कुजवणारी
बुरशी मिश्रण 1.5:0.5 या प्रमाणात टाकून कुजवल्यानंतर वापरावे. शेळी-मेंढी खत
वापरण्याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात शेळी-मेंढी खत शेतात घालतात. तर
दूसऱ्या प्रकारात शेळ्या-मेंढया शेतात रात्रीच्या वेळी बसवता. पहिल्या प्रकारात
शेळी-मेंढीचे मूत्र वाया जाते तर दूसऱ्या प्रकारात शेळी-मेंढीच्या लेंडया/ विष्टा
सोबत मातीत मिसळल्या जाते नंतर वखराच्या साहाय्याने सर्व शेतात पसरून द्यावे व
हलके पाणी द्यावे.
पशुधन
व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे
संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे
लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.
सामुदायिक
विज्ञान
आयूष्यातील उत्तम ध्येय सिध्दीसाठी
जीवन चक्राच्या सुरूवातीच्या टप्प्यात जीवनाची दीर्घकालीन उद्दिष्टे विचारपूर्वक
निश्चित केली पाहिजेत.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 69/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
25.11.2022
Tuesday, 22 November 2022
Monday, 21 November 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान किमान तापमान
सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर, 2022 दरम्यान कमाल
तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या
झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या
अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या
वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क
किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ
व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि
एक खुरपणी करावी. रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते पेरणी 60X30
सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे.
पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75
किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक
महीण्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 + युरिया 100 किलो किंवा 500 किलो
15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया 163 किलो + 469 किलो सिंगल सुपर
फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो
युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावा. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर 25 ते 30
दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा 87 किलो यूरिया
प्रति हेक्टरी द्यावा. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास
पहिली कोळपणी करावी. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. गव्हाची
पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो किंवा 87 किलो डायअमोनियम
फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 87 किलो युरिया +
सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा
द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30
दिवसांनी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
सध्या किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी पिकावर याचा परिणाम
होऊ नये म्हणून बागेस सकाळी मोकाट
पध्दतीने पाणी द्यावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30% 13 मिली किंवा
बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष
बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून
प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची
काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.
पशुधन
व्यवस्थापन
थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच
कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून
त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत.
पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.
सामूदायीक विज्ञान
काम करतांना वारंवार उठ-बस करण्यामूळे व्यक्तींच्या स्नायुंवर ताण
येऊन थकवा येतो.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 68/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
22.11.2022
Friday, 18 November 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 18 ते 24 नोव्हेंबर व दिनांक 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 नोव्हेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा
राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि
मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
जोमदार वाढीसाठी हरभरा पिक
सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली
कोळपणी करावी. करडई पिकात उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी व दोन रोपातील अंतर 20 सेंमी
ठेवावे. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा यांच्या
व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% एससी 10 मिली किंवा
बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी
करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या
अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
15 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस
लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26 किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो
म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया +
531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा
द्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा
इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग
ग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. काढणीस
तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मिरची पिकावर सध्या
फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम
किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5%
एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी
करावी.
तुती रेशीम
उद्योग
लहान व मध्यम भुधारक शेतकऱ्यांनी
संसाधन उपलब्धतेनुसार शेतीचे नियोजन व त्याची आमलबजावणी योग्य करावी. शेती पडीत
ठेवू नये, अर्धा किंवा एक ते दीड एकर तुती पट्टा पध्दतीने लागवड केली तर वर्षासाठी
बऱ्यापैकी उत्पन्न मिळते न्वहे तर पगारासारखे दर महा 40 ते 60 हजाराचे कोषाच्या
पीकापासून उत्पन्न मिळते. कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन
योजनेत माहिती घेऊन जिल्हा रेशीम कार्यालयात या महीण्यात आपली नोंदणी करावी व जानेवारी
महिण्यापर्यंत तुती रोपवाटीका लागवड करावी जेणेकरून जुन महिण्या पर्यंत रोपे 3.5
ते 4 महिण्याचे झाल्यानंतर शेतात लागवड करता येतील. जमीन तयार करून एकरी 8 टन
शेणखत दोन हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 ते 8 टन प्रत्येकी या प्रमाणे
द्यावे.
पशुधन
व्यवस्थापन
गाईंच्या वासरांमध्ये देखील लम्पी
स्कीन रोगाचा प्रादूर्भाव प्रकर्षाने जाणवत आहे. यासाठी ज्या वासरांना लसीकरण
व्हावयाचे आहे अशा वासरांना लसीकरण पूर्व सात दिवस व लसीकरण पश्चात सात दिवसांनी
वयोमानानुसार जंतनाशक/पट्टकृमीनाशक/ कॉक्सीडोओसीस रोधक औषधीची मात्रा देण्याची
शिफारस करण्यात येते. वयोगट :- सात दिवस ते सहा महीने या वासरांमध्ये टॉक्सोकॅरा
व्हीट्रलोरम् या कृमीसाठी जंत नाशकाची मात्रा द्यावी. हे कृमी विष्ठेद्वारे बाहेर
पडतात. मात्रा वयाच्या सातव्या दिवशी अथवा त्यानंतर. वयोगट :- एक महीना ते सहा
महीने माती चाटल्यामूळै रक्त मिश्रीत/ आवमिश्रीत हगवण लागते. कॉक्सीडीओसीस रोधक
औषधीची मात्रा पशूवैद्यक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली द्यावी. वयोगट:- तीन महीने ते
सहा महीने पडकावरील गवतावर चरतेवेळेस त्यावरील खरपड्याद्वारे पट्टकृमीची लागण
होते. भाताच्या शितासारखे कृमीचे तूकडे विष्ठेद्वारे बाहेर टाकले जातात, म्हणून
पट्टकृमीस बाहेर काढणारी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. थंडी पासुन पशुधनाचे
संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे
लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.
सामुदायिक
विज्ञान
घरकाम करतांना वस्तूंची ने-आण
करण्यासाठी ट्रॉली किंवा ट्रे चा वापर केल्याने मार्गक्रमण कमी होउन कामातील कष्ट
कमी होण्यास मदत होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 67/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
18.11.2022
Tuesday, 15 November 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे
ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला
आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 ते 26 नोव्हेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान सरासरीएवढे
व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या
झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या
अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या
वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात
लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम
मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन
फवारण्या घ्याव्यात. उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या
(मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी
(जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम
किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60
ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर
फवारणी करावी. उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा
प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75%
400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून फवारावे. उशीरा लागवड केलेल्या
कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी
10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूरीवरील शेंगा पोखरणारी
अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली
किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5
ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ
व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि
एक खुरपणी करावी. रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते पेरणी 60X30
सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे.
पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75
किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक
महीण्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 + युरिया 100 किलो किंवा 500 किलो
15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया 163 किलो + 469 किलो सिंगल सुपर
फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो
युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावा. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले
असल्यास पहिली कोळपणी करावी. वेळेवर पेरणी
करावयाच्या बागायती गहू पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. वेळेवर पेरणीसाठी
त्र्यंबक, गोदावरी, फुले समाधान इत्यादी वाणांपैकी निवड करावी. गव्हाची पेरणी
करतांना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे,
याकरिता 192 किलो 10:26:26 + युरिया 67 किलो किंवा 109 किलो डायअमोनियम फॉस्फेट +
युरिया 66 किलो किंवा 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश +
109 किलो युरिया प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेत
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित
होण्यासाठी 13:00:45 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. द्राक्ष बागेत फळधारणा व्यवस्थित होण्यासाठी बागेस आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत
पाठवावी.
भाजीपाला
पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या
व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर
फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी करुन घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
गाईंच्या वासरांमध्ये देखील लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव
प्रकर्षाने जाणवत आहे. यासाठी ज्या वासरांना लसीकरण व्हावयाचे आहे अशा वासरांना
लसीकरण पूर्व सात दिवस व लसीकरण पश्चात सात दिवसांनी वयोमानानुसार जंतनाशक/पट्टकृमीनाशक/
कॉक्सीडोओसीस रोधक औषधीची मात्रा देण्याची शिफारस करण्यात येते. वयोगट :- सात दिवस
ते सहा महीने या वासरांमध्ये टॉक्सोकॅरा व्हीट्रलोरम् या कृमीसाठी जंत नाशकाची
मात्रा द्यावी. हे कृमी विष्ठेद्वारे बाहेर पडतात. मात्रा वयाच्या सातव्या दिवशी
अथवा त्यानंतर. वयोगट :- एक महीना ते सहा महीने माती चाटल्यामूळै रक्त मिश्रीत/
आवमिश्रीत हगवण लागते. कॉक्सीडीओसीस रोधक औषधीची मात्रा पशूवैद्यक तज्ञांच्या
मार्गदर्शनाखाली द्यावी. वयोगट:- तीन महीने ते सहा महीने पडकावरील गवतावर
चरतेवेळेस त्यावरील खरपड्याद्वारे पट्टकृमीची लागण होते. भाताच्या शितासारखे
कृमीचे तूकडे विष्ठेद्वारे बाहेर टाकले जातात, म्हणून पट्टकृमीस बाहेर काढणारी
जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया,
मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून
त्यांचे संरक्षण होईल.
सामूदायीक विज्ञान
काम करतांना वारंवार उठ-बस करण्यामूळे व्यक्तींच्या स्नायुंवर ताण
येऊन थकवा येतो.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 66/
2022 - 2023 मंगळवार,
दिनांक –
15.11.2022
Friday, 11 November 2022
Thursday, 10 November 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 11 ते 17 नोव्हेंबर व दिनांक 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान किमान तापमान
सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला
तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा
राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात
लवकर संपवावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X10 सेंमी अंतरावर
करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश
(109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 12 किलो युरिया किंवा 54.25 किलो युरिया + 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 50
किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. बागायती करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी.
पेरणी 45X20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी
शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद
प्रति हेक्टरी द्यावे व 30 किलो नत्र एक
महिन्यानी द्यावे (पेरणीच्या वेळी 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 31 किलो युरिया
किंवा 65 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी द्यावे व
पेरणी नंतर एक महीन्यानी 65 किलो युरिया द्यावा). हळदीवरील
पानावरील ठिपके आणि करपा यांच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2%
+ डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज
व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे
निष्कर्ष दिले आहेत). पूर्व हंगामी ऊसाची
लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो
स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26
किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर
फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी
बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी
बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा
इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग
ग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी
करावी.
भाजीपाला
पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या
(टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर,
मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे
याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा
सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी
करावी.
तुती रेशीम
उद्योग
उझी माशी रेशीम किटकावर उपजिविका करणार
परोपजिवी कीड आहे. या कीडीच्या प्रादूर्भावामुळे 20 टक्क्यापर्यंत कोष पीकाचे
नुकसान होते. अंडी, अळी, कोष व प्रौढ माशी अशा चार अवस्थेचा जिवन क्रम असून
एकात्मीक पध्दतीने नियंत्रण उपाय करावेत. कच्या शेडनेट संगोपनगृहात उझी माशी सरळ
प्रवेश करणार नाही यासाठी तुती पाने/ फांद्या छाटणी नंतर अंधार खोलीत अर्धा ते एक
तास साठवून नंतर संगोपनगृहात न्यावा व खाद्य द्यावे. शेडनेटच्या जाळीच्या वरच्या
बाजूस छिद्र राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमीनीवर फरशी करावी. चौथी कात
टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी लिसोलायनेक्स थायमंस परोपजिवी कीटकाचे दोन पाउच प्रति
शंभर अंडीपुज या प्रमाणात रॅकवर चंद्रिके जवळ ठेवावेत, कोष काढणी नंतर खताच्या
खड्डयाजवळ ठेवावेत.
पशुधन
व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोग
चालू आहे. त्यातच चार महिण्याखालील वासरांमध्ये जास्तीचा प्रादूर्भाव आढळत आहे, म्हणून
वासरांचे आरोग्य अबाधीत राहून त्यांना लम्पी रोगाशी सामना करता यावा यासाठी
त्यांना 1. सात दिवस व त्यापुढील वासरांना जंतनाशकाची प्रथम मात्रा त्वरीत द्यावी.
2. ज्या वासरांनी चरावयास सुरूवात केली आहे, माती चाटत आहेत अथवा आवमिश्रीत रक्ती
हगवण आहे अशा सर्व वासरांना तात्काळ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली कॉक्सीडीओसीस
(रक्ती हगवण) रोधक औषधीची मात्रा देउन घ्यावी.
सामुदायिक
विज्ञान
जड कामे करतांना दोन्ही हातांचा
एकत्रित वापर करावा. जेणेकरून कामाचा थकवा कमी जाणवतो.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 65/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक
– 11.11.2022
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...