प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे व त्यानंतर तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
मराठवाडयात दिनांक 08 सप्टेंबर
रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 09 व 10 सप्टेंबर रोजी बऱ्याच
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी
हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 08 ते 14 सप्टेंबर 2023 व दिनांक 15
ते 21 सप्टेंबर दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 13 ते 19 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
शक्य असल्यास वापसा स्थितीत सोयाबीन
पिकातील उपटतण करून घ्यावे, जेणेकरून रब्बी हंगामात होणाऱ्या तणांचा प्रादूर्भाव
कमी होईल. सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, शेंगा पोखरणारी अळी, तंबाखू वरील पाने
खाणारी अळी आणि केसाळ अळी या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 60 मिली किंवा थायमिथोक्झाम 12.6% + लँम्बडा सायहँलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) - 50 मिली किंवा इमामेक्टिन
बेंझोएट 1.90 % - 170 मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 % + लँम्बडा सायहँलोथ्रिन
4.6 %- 80 मिली (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% - 100 ते 120
मिली किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49 % + इमिडाक्लोप्रीड 19.81 % (पूर्वमिश्रित कीटकनाशक)
-140 मिली किंवा असिटामाप्रीड 25 % + बाइफेन्थ्रीन 25 %-100 ग्रॅम यापैकी कुठलेही एक
कीटकनाशक प्रती एकर याप्रमाणात पावसाची उघाड बघून फवारावे. सध्याच्या ढगाळ व दमट
हवामानामूळे सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता टेब्युकोनॅझोल 10%+
सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल 25.9
% -250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन
13.3 % + इपिक्साकोनाझोल
5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे.
खरीप ज्वारी व बाजरी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के
4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे
फवारणी करावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम
ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त
प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति
एकर जमिनीतून वापर करावा. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. हळद पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम
30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली
किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा
डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी
15 दिवसांच्या अंतराने करावी. मृग
बहार धरलेल्या मोसंबी फळबागेत फळगळ थांबविण्यासाठी 100 लिटर पाण्यात एक किलो
यूरिया + 30 मिली प्लॅनोफिक्स द्रावणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब फळबागेत फळवाढीसाठी 00:00:50 1.5 किलो
प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला
सध्याच्या ढगाळ व दमट
वातावरणामूळे भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी
मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची
काढणी करून घ्यावी.
चारा पिके
मका पिकावरील लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे
उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची किंवा
अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून
फवारणी करावी.
तुती रेशीम
उद्योग
ढगाळ हवामानात पाऊस जास्त असेल तर
तुती लागवडीत तण व गवत वाढते. उघाड पडताच वखराणे पाळी करावी व तण खुरपून घ्यावे.
तणनाशकाचा वापर टाळावा. हराळी जास्त असेल तर कापून घ्यावी नंतर वखर पाळी करावी.
हवेत आर्द्रता 85 टक्केच्या वर असेल तर भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू) प्रादुर्भाव
होतो. पानाच्या मागच्या बाजुस पांढरे डाग दिसतात. पाने कडक होऊन पिवळे पडतात.
बाव्हेस्टीन (कार्बेन्डाझीम) बुरशिनाशक 500 ग्रॅम 250 लिटर पाण्यात मिसळून एकरी
फवारणी करावी व 5 दिवसांनी तुती पाने खाद्य म्हणून किटकांना घालतात.
पशुधन व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन
रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील
वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची
शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या
दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक
तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे
विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी
कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची
या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
सामुदायिक विज्ञान
बालकांचा विकास साधण्यासाठी
कुटुंबियांनी त्यांना सोप्या भाषेत लहान लहान गोष्टी सांगाव्यात. गोष्टी सांगत
असतांना त्या आवाजात चढउतार करून, चेहऱ्यावर योग्य हाव-भाव करून व त्यासाठी
चित्रांची मदत घेऊन सांगितल्यास बालकांना त्या अधिक मनोरंजक वाटतात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 46/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 08.09.2023
No comments:
Post a Comment