Thursday 30 November 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर, हिंगोली, परभणी जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 व 05 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर, हिंगोली, परभणी जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 व 05 डिसेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 01 ते 07 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त तर दिनांक 08 ते 14 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व वेचणी केलेला कापूस वेगळा साठवावा. पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. कापूस पिकात बाह्य बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 25% ईसी  10 मिली किंवा प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 25 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन 20 % डब्ल्यूजी  10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात अंतर्गत बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.पाऊस झालेल्या ठिकाणी तूर पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे उशीरा पेरणी केलेल्या तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हरभरा पिकात मर, मूळकूज, मानमूज रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामूळे वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  पाऊस झालेल्या ठिकाणी  पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. रब्बी पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, पाऊस झालेल्या सिताफळ, संत्रा/मोसंबी, डाळींब  व केळी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.वादळी वारा, पाऊस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी बागेमध्ये ब्लोअर फिरवून द्राक्ष गुच्छांमध्ये साठलेले पाणी निघून जाईल याची काळजी घ्यावी.

चारा पीके

पाऊस झालेल्या ठिकाणी चारा पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वारा, पाऊस झालेल्या ठिकाणी प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक संगोपनगृहात ढगाळ हवामानात आर्द्रता 90 टक्के किंवा त्याच्या वरती राहते. तुती पाने पावसाने ओली झाली असतील तर प्रथम छाटणी नंतर अंधार खोलीत अर्धा तास ठेवून पाणी निचरल्या नंतर रॅकवर टाकावित. अंधार खोलीचा आणखी एक फायदा म्हणजे उझी माशी अंधारात थांबत नाही बाहेर निघून जाते. आर्द्रता 85 टक्केच्या वर असेल तर आणि तापमान जास्त असेल तर ग्रासरी रोगाची व हिरवा किंवा पांढरा मस्करडीन रोगाची लागण रेशीम किटकांना होते. किटक खडू सारखे कडक होतात त्यासाठी विजेता सप्लीमेंट निर्जंतूक पावडरचा 4.5 कि.ग्रॅ/100 अंडिपूंज या प्रमाणात वापर करावा. सोबत पांढरा चुना आर्द्रता कळी करण्यासाठी व संगोपनगृहातील वातावरण निर्जंतूक करण्यासाठी 10 ते 15 कि.ग्रॅ./100 अंडिपूंज असा वापर करावा.

पशुधन व्यवस्थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्या मध्ये मिसळू देऊ नये. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.

सामुदायिक विज्ञान

रोजच्या आहारात 30 ग्रॅम पेक्षा जास्त साखर वापरू नये कारण जास्त साखरेमूळे जास्त कॅलरी मिळतात त्यामूळे वजन वाढते. वजन वाढल्यामूळे ऱ्हदयरोग आणि मधूमेह होण्याचा धोखा असतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक70/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 01.12.2023

 

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...