Tuesday, 28 June 2022
दिनांक 28 व 29 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 30 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 28 व 29 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 30 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात
दिनांक 28 जून ते 02 जुलै दरम्यान
बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात
ज्या तालूक्यात पेरणी योग्य मौसमी पाऊस (75-100 मिमी) झाला असल्यास (औरंगाबाद
जिल्हा : गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, औरंगाबाद, कन्नड, पैठण, फुलंब्री, शिल्लोड, वैजापूर ; बीड जिल्हा : आंबाजोगाई,
माजलगाव, परळी, वडवणी, धारूर, केज ;
हिंगोली जिल्हा :
कळमनूरी ; जालना
जिल्हा : भोकरदन, मंठा, अंबड, परतूर ; परभणी जिल्हा : गंगाखेड, मानवत, पालम, परभणी, सोनपेठ, सेलू, पाथरी, पूर्णा ;
नांदेड जिल्हा : देगलूर,
मुदखेड, मुखेड, नांदेड, उमरी, हिमायतनगर, किनवट, धर्माबाद, कंधार, लोहा, माहूर ;
लातूर जिल्हा : अहमदपूर,
चाकूर, देवणी, जळकोट,
रेणापूर, शिरूर अनंतपाल, उदगीर, लातूर, निलंगा उस्मानाबाद : भूम, वाशी) जमिनीतील
ओलावा बधून बिजप्रक्रिया करूनच पेरणी
करावी.
सॅक, इसरो
अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय
छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस
होण्याची वाट पाहावी व पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस बियाण्यास
थायरम/कॅप्टन/सुडोमोनास या बूरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. यामूळे मर व करपा यासारख्या रोगांचा प्रादूर्भाव कमी होतो.
नत्र स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर/ॲझोस्पिरीलम या जिवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति
किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते.
पेरणीपूर्वी तूर बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम प्रति किलो
बियाण्यास चोळावे यामूळे जमिनीतून उदभवणाऱ्या विविध रोगापासून पिकाचा बचाव होतो.
पेरणीपूर्वी बियाण्यास 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गूळाच्या द्रावणातून
चोळावे. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक (पीएसबी) 250 ग्रॅम प्रति 10 किलो
बियाण्यास योग्य प्रकारे लावावे. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग/उडीद
पेरणीपूर्वी बियाण्यास 1 ग्रॅम बाविस्टीन किंवा 2 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच
ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक
रायझोबियम व पीएसबी 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग
पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी.
(उपट्या) तर 45 X 15 सें.मी. (पसऱ्या) अंतरावर करता येते.
पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 200 कि.ग्रॅ. उपटया तर 80 कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे
वापरावे. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकास पेरणीपूर्वी
सायॲन्ट्रानिलीप्रोल 19.8% + थायामिथॉक्झाम 19.8% एफएस 6 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी या बिजप्रक्रियेमूळे
पेरणीनंतर 15 ते 20 दिवसापर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते.
बियाण्यास थायरम 2 ते 2.5 ग्रॅम तसेच ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक 25 ग्रॅम
प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता
येते.
फळबागेचे व्यवस्थापन
पाऊस झालेल्या ठिकाणी नविन केळी
बागेची लागवड करावी. आंबा फळबागेत 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति
झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. झाड दहा वर्षापेक्षा मोठे असल्यास 1000:500:500
ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. वाळलेल्या व रोगग्रस्त
फांद्यांची छाटणी करावी. द्राक्ष बागेतील
फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची
दक्षता घ्यावी. सिताफळ बागेत 300:300:300 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड
खतमात्रा द्यावी.
भाजीपाला
भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पावसाळयामध्ये शक्यतो शेळ्या मेंढ्यांना उघडयावर ठेवण्याऐवजी
शेडमध्ये बांधावे त्यामूळे त्यांना पावसाचा मार बसणार नाही आणि त्यांचे शरीर
तापमान कमी होणार नाही. भिजल्यामुळे
शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फूसाचा दाह होण्याची
शक्यता असते (थंड पाण्याच्या मारामूळे) तसेच दलदल जमीनीमूळे खूर सडण्याची समस्या
उद्भवणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे,
ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा
होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मातेचे पहिले दूध नवजात शिशूस
पाजण्यापूर्वी इतर पदार्थ जसे-मध, एरंडेल तेल, ग्लुकोजचे पाणी इ. देणे टाळावे.
सुरूवातीच्या सहा महिन्यात नवजात बालकास केवळ स्तनपान देणेच योग्य आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 26
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 28.06.2022
Friday, 24 June 2022
Tuesday, 21 June 2022
दिनांक 21 जून रोजी जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 22 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 21 जून रोजी जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 22 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
पेरणी योग्य पाऊस होण्याची वाट पाहावी व पेरणी
योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक (ईआरएफएस) 24 जून ते 30 जून, 2022 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू बिटी कापसाची लागवड 120 X 45 सें.मी. अंतरावर करता येते. लागवडीसाठी 2.5 ते
3.0 कि. ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत
करता येते. कोरडवाहू तूरीची लागवड 90 X 20 ते 30 सें.मी.
अंतरावर करता येते. बागायती तूरीची लागवड 90 X 90 सें.मी.
टोकन पध्दतीने करता येते. कोरडवाहूसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ. बियाणे तर
बागायती टोकन पध्दतीने लागवडीसाठी 5 ते 6 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. मूग व उडीद पिकाची पेरणी 30 X
10 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ.
बियाणे वापरावे. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. भुईमूग
पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी. (उपट्या) तर 45 X 15 सें.मी. (पसऱ्या) अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 200
कि.ग्रॅ. उपटया तर 80 कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे वापरावे. भुईमूग पिकाची पेरणी
7 जूलै पर्यंत करता येते. मका पिकाची पेरणी 60 X 30 सें.मी.
अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. मका पिकाची पेरणी
जूलै अखेर पर्यंत करता येते.
फळबागेचे व्यवस्थापन
जून्या केळी बागेत आंतर मशागतीची कामे
पूर्ण करून घ्यावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील
वाळलेली पाने काढून टाकावीत. आंबा फळबागेत 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश
प्रति झाड खतमात्रा दिली नसल्यास द्यावी. झाड दहा वर्षापेक्षा मोठे असल्यास
1000:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. वाळलेल्या व
रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची
विरळणी करावी. सिताफळ बागेत 300:300:300 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड
खतमात्रा द्यावी.
भाजीपाला
भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पशुधनात (गाय, म्हैस) यांना
लसीकरणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 1. लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण वर्षातून
दोन वेळा लसीकरण करावे. 2. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे (एकत्रित किंवा स्वतंत्र)
पावसाळा सुरू होण्यापूर्वी लसीकरण करावे. 3. ब्रुसेललोसीस कॉटन प्रजाती 19 (3 ते 4
महिने) वयोगटातील वासरांसाठी. 4. फाशी रोग होत असलेल्या विभागात फाशी रोगाची लस 2
ते 3 किलोमिटर परिसरातील पशुधनास चक्राकार पध्दतीने करावे. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या
ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा
बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी
रोजच्या आहारात तंतूमय युक्त अन्न पदार्थांचा जसे की, भगर, बाजरी, नाचनी, राजमा,
चवळी, मटकी, सोयाबीन, मेथीची भाजी, राजगिऱ्याची भाजी आणि शेवग्याची पाने यांचा
वापर करावा. त्यामूळे रक्तातील वाढणारी साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 24
/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 21.06.2022
Friday, 17 June 2022
दिनांक 17 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 18 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 18 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
पेरणी योग्य पाऊस होण्याची वाट पाहावी व पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
विस्तारीत अंदाजानुसार(ईआरएफएस)मराठवाड्यात दिनांक 17 जून ते 23 जून, 2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 24 ते 30 जून 2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीनची पेरणी 45 X 5 सें.मी. अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे वापरावे. सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 15 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. बाजरीची पेरणी 45 X 10 ते 15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यंत करता येते. ऊस पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या चार महिन्यापर्यंत वाढ होतील अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये मिरची, घेवडा, कोथंबीर इत्यादी सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद या पिकांमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. तूरळक ठिकाणी पाऊस झाल्यामूळे संत्रा/मोसंबी फळबागेत फुलधारणा झाली आहे. एकसारखी फुलधारणा होण्यासाठी बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या घ्याव्यात. नवीन डाळींब लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. नवीन चिकू लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत.
भाजीपाला
बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
चारा पिके
मका या चारापिकाच्या लागवडीसाठी आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगासफेद, विजय इत्यादी जातींची निवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
तुती रेशीम उद्योग
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतीची बेण्यापासून लागवड केली असेल अशा शेतात मोठया प्रमाणावर 20-25 % पर्यंत तुट राहते. मनरेगा योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षात 90 टक्के झाडांची संख्या असणे आवश्यक आहे त्यामुळे तुतीची लागवड बेण्याएवजी 3 महिने वयाच्या रोपांपासून करण्याची महाराष्ट्र शासनाने सक्ती केली आहे. लागवउ केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन अपेक्षित तुती पानांचे उत्पादन मिळते.
सामुदायिक विज्ञान
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये विविध पानांची (पावडर) भुकटीचा उपयोग करता येतो. जसे, कढीपत्यांची पाने, कोबीची पाने, राजगिऱ्याची पाने, शेवग्याची पाने, हरबऱ्याची पाने आणि बिटाची पाने इत्यादी.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 23/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 17.06.2022
Tuesday, 14 June 2022
दिनांक 14 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 15 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 14 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 15 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग मागील आठवडयाच्या तूलनेत कमी झालेला आहे.
खरीप पिकांची पेरणी पूरेसा पाऊस होईपर्यंत व पुढील सुचना मिळेपर्यंत
थांबवावी.
विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक (ईआरएफएस) 19 जून ते 25 जून, 2022
दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे
तर किमान तापमान
सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार दिनांक 19 ते 25 जून , 2022 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस +
सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस +
मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते. तुरीचे
उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी (2:4),
तुर + ज्वारी (3:3 किंवा 2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे
प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. आंतरपीक
म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते या पिकांच्या
कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात. भुईमूगापासून
अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्यास भुईमूग + सोयाबीन (6:2), भुईमूग +
सुर्यफूल (6:2), भुईमूग + तीळ (6:2), भुईमूग + मूग (6:2), भुईमूग + उडीद (6:2),
भुईमूग + तुर (6:2), भुईमूग + ज्वारी (1:1), भुईमूग + कापूस (2:1) या प्रमाणात
पेरणी करून दोन्ही पिकांचे अधिक उत्पादन मिळते. मका या
पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी आंतरपीक महत्वाचे आहे. आंतरपिकासाठी कडधान्ये (उडीद,
मुग, चवळी), तेलबिया (भुईमूग, सोयाबीन), भाजीपाला (मेथी, कोबी, कोथिंबीर,पालक)
इत्यादी पिकांची लागवड करता येते.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी लागवडीसाठी पूर्व
तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. जून्या केळी बागेत आंतर
मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील वाळलेली पाने काढून
टाकावीत. नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती
पूर्ण करून घ्यावीत. जून्या आंबा बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी
जेणेकरून बागेत वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही. द्राक्ष बागेत पानांची विरळणी
करावी. नवीन सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती
पूर्ण करून घ्यावीत. जून्या सिताफळ बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असलेल्या
शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास
टाकून घ्यावे. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या
साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असलेल्या
शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी टाकून रोपे तयार
करावी. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने
पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून
(ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या
फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पशुधनास तज्ञ पशुवैद्यकाकडून
घटसर्प, फऱ्या रोग प्रतिबंधक लसी
द्याव्यात. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते
40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर
आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ
नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी
रोजच्या आहारात तंतूमय युक्त अन्न पदार्थांचा जसे की, भगर, बाजरी, नाचनी, राजमा,
चवळी, मटकी, सोयाबीन, मेथीची भाजी, राजगिऱ्याची भाजी आणि शेवग्याची पाने यांचा
वापर करावा. त्यामूळे रक्तातील वाढणारी साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 22 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 14.06.2022
Friday, 10 June 2022
दिनांक 10, 11 व 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 13 व 14 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 10, 11 व 12 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 13 व 14 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो
अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय
छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग मागील आठवडयाच्या तूलनेत कमी झालेला आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक (ईआरएफएस) क 15 जून ते 21
जून, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान
सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार दिनांक 15 ते 21 जून ,
2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्यामूळे शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तुर हे
आंतरपीक 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे
आंतरपीक 1:1 किंवा 2:1 या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी
पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. आंतरपीक पध्दतीमध्ये
खरीप ज्वारी + सोयाबीन 2:4 किंवा 3:6 या प्रमाणात दोन ओळीतील अंतर 45 सेंमी
ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तुर 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात आंतरपीक घेता येते.
सोयाबीन, मुग, उडीद ही कमी कालावधीची पिके आंतरपीके म्हणून घेताना 2:4 या आंतरपीक
पध्दतीचा अवलंब करावा. खरीप ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली
नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. बाजरी पिकामध्ये बाजरी + तुर हे आंतरपीक 2:1,
3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. बाजरी पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे
केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. ऊस पिकात आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.
पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये आंतरपीके
घेताना पहिल्या चार महिन्यापर्यंत वाढ होतील अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत.
यामध्ये मिरची, घेवडा, कोथंबीर इत्यादी सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद या
पिकांमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत मृगबहारासाठी खत
मात्रा दिली नसल्यास मोसंबीसाठी 400:400:400 व संत्र्यासाठी 500:500:500 ग्राम
प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा. डाळिंब बागेत मृगबहारासाठी खत मात्रा
दिली नसल्यास डाळींबासाठी 300:250:250
ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद :
पालाश खत मात्रा द्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा.
चिकू बागेत खत मात्रा दिली नसल्यास 500:500:500 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद :
पालाश खत मात्रा द्यावी. वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे लहान झाडांना आधार द्यावा.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला
(वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी
टाकावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची
रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता
असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
चारा पिके
मका या चारापिकाच्या लागवडीसाठी
आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगासफेद, विजय इत्यादी जातींची निवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबू नये.
तुती रेशीम
उद्योग
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतीची
बेण्यापासून लागवड केली असेल अशा शेतात मोठया प्रमाणावर 20-25 % पर्यंत तुट राहते.
मनरेगा योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षात 90 टक्के झाडांची संख्या असणे आवश्यक आहे
त्यामुळे तुतीची लागवड बेण्याएवजी 3 महिने वयाच्या रोपांपासून करण्याची महाराष्ट्र
शासनाने सक्ती केली आहे. लागवउ केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे
मरण्याचे प्रमाण नगण्य राहते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन अपेक्षित तुती
पानांचे उत्पादन मिळते.
सामुदायिक विज्ञान
हाडाच्या मजबुतीसाठी कॅल्सीयम युक्त
अन्नपदार्थ नियमित घ्यावेत, उदा. दूध व दूधाचे पदार्थ, शेवग्याची पाने, फुलकोबीची
पाने, नाचणी, बीट, हरभऱ्याची पाने, चमकुरा, कडीपत्ता, तीळ इत्यादी.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 21/2022
- 2023 शुक्रवार, दिनांक – 10.06.2022
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...