Friday, 30 September 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर
दिनांक 07 ते 13
ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी
झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 ऑक्टोबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे
तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर पेरणी केलेल्या व लवकर पकव
होणाऱ्या सोयाबीनच्या जाती काढणीस तयार असल्यास स्वच्छ हवामानात पिकाची वेळेवर
काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून
ठेवावे. उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव
दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5%
भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन
50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम
लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने
क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ठिपके
याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जेथे शक्य आहे तेथे
हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. कोरडवाहू हरभरा पिकाची
पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. जेथे शक्य आहे तेथे करडई पिकाच्या
पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. हमखास पावसाच्या भागात करडई पिकाची
पेरणी 15 ऑक्टोबर पर्यंत करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20
ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास
दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची
कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत
रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5% किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3
ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5
ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1
ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. चिकू
बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी
ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय
भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. रब्बी हंगामाकरिता
लागणाऱ्या भाजीपाला पिकांच्या बियाण्याची गादी वाफ्यावर पेरणी केली नसल्यास पेरणी
लवकरात लवकर करावी.
चारा पिके
चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत
नेपियर पिकाची पहिली कापणी 65 ते 70
दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.
फुलशेती
नवरात्री उत्सवामूळे बाजारपेठेत
फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व
प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम कोषाचा बाजारातील भाव कोषातील
रेशीम धागा टक्केवारीवर अवलंबून असतो. तेव्हा ए ग्रेड कोष उत्पादन करण्यासाठी
तुतीच्या पानाची प्रत उत्तम असावी लागते. त्यासाठी विषमूक्त व सेंद्रीय खत देणे
गरजेचे आहे. एक किलो कोष होण्यासाठी कमीत कमी कोषाची संख्या हवी. साधारणपणे 550 ते
600 कोष एक किलोत बसले तर ए ग्रेड, 600 ते 700 कोष बसले तर बी ग्रेड, 700 ते 800
कोष बसले तर सी ग्रेड व 800 च्या वर बसले तर डी ग्रेड. एक कि.ग्रॅ. रेशीम धागा
तयार होण्यासाठी लागणार कोष संख्या (किलो) त्यास रिनडाटा असे म्हणतात. मागील दशकात
8.5 किलो कोष वरून सध्या 6.5 किलो पर्यंत रीनडाटा ने मजल मारली आहे.
पशुधन
व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन
डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या
माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा :
यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस,
क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन
डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास
अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. अ) शेणाची योग्य
विल्हेवाट लावणे व शेणाचा खड्डा
पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा
रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून
गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते. अ)
पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व
गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती
आपली अंडी घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. ब) या
माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा
सोडून पशुधनास चरावयास सोडावे.
सामुदायिक
विज्ञान
बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक
पातळीस अनुसरून मनोरंजकरित्या गोष्टी सांगाव्या, कारण गोष्टी ऐकल्यामूळे त्यांचा
शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, जिज्ञासा, बौध्दीक, कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती वृध्दिंगत
होते. याबरोबरच त्यांचा वाचा व भाषा भावनात्मक, सामाजिक व नैतिक विकास साधण्यासाठी
गोष्टी लाभदायी ठरतात.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 53/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
30.09.2022
Tuesday, 27 September 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना जिल्हयात ; दिनांक 27 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, लातूर जिल्हयात ; दिनांक 28 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 30 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 ऑक्टोबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे
तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे)
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची
किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक)
एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम
किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या
व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस
पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस
50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4%
400 मिली किंवा थायोडीकार्ब
75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारावे. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणी केलेल्या शेंगा मळणी केलेल्या मुग/उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. उशीरा पेरणी
केलेल्या भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड
17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी
20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी भुईमूग
पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी भुईमूग पिकाची पेरणी
30 सप्टेंबर पर्यंत करावी. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून
घ्यावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे
करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात
(1 ते 15 ऑक्टोबर) करावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी सुर्यफुल पिकाच्या पेरणीसाठी
पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी सुर्यफलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या
पहिल्या पंधरवाडयात करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी फळ पिकावरील करपा (सिगाटोका) रोगाच्या व्यवस्थापनासाठी
मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन
5% डब्ल्यू जी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीचे
नियोजन करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी
तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला
टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन
18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी
मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
नवरात्री उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस
तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत
पाठवावी.
पशुधन
व्यवस्थापन
गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा
प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय
माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया
प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या
माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत
करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती
अंडी घालते. अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. ब) पशुधनाच्या
शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. टॅबॅनस
ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व
त्याजागी रक्त वाहते. अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत)
चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या
वैरणीवरती आपली अंडी घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये
टाकावी. ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या
वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.
सामूदायीक विज्ञान
पावसाळयात
पचनक्रिया मंदावल्याने अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी यासाठी पावसाळयात
पचनास हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 52/
2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 27.09.2022
Friday, 23 September 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर दिनांक 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात
पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर
बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर
65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल
25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल
5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली
प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील
किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली
प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन
9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा
क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6%
80 मिली प्रति एकर
(पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते
120 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे. खरीप
ज्वारी पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5%
भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन
50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. ऊस
पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी
5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा
मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली
किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली
प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळदीच्या पानावरील ठिपके याच्या
व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे
स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा
उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी
साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान
मानवते. करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन
निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी व
फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर
पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. डाळींब बागेत रोगाच्या
व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5% किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3
ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5
ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1
ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. चिकू
बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून
तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.
चारा पिके
चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत
नेपियर पिकाची पहिली कापणी 65 ते 70
दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.
फुलशेती
फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे.काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम कोषाचा बाजारातील भाव कोषातील
रेशीम धागा टक्केवारीवर अवलंबून असतो. तेव्हा ए ग्रेड कोष उत्पादन करण्यासाठी
तुतीच्या पानाची प्रत उत्तम असावी लागते. त्यासाठी विषमूक्त व सेंद्रीय खत देणे
गरजेचे आहे. एक किलो कोष होण्यासाठी कमीत कमी कोषाची संख्या हवी. साधारणपणे 550 ते
600 कोष एक किलोत बसले तर ए ग्रेड, 600 ते 700 कोष बसले तर बी ग्रेड, 700 ते 800
कोष बसले तर सी ग्रेड व 800 च्या वर बसले तर डी ग्रेड. एक कि.ग्रॅ. रेशीम धागा तयार
होण्यासाठी लागणार कोष संख्या (किलो) त्यास रिनडाटा असे म्हणतात. मागील दशकात 8.5
किलो कोष वरून सध्या 6.5 किलो पर्यंत रीनडाटा ने मजल मारली आहे.
पशुधन
व्यवस्थापन
लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक
मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय.
यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे
गोचीडे यांचा समावेश होतो. याच्या नियंत्रणासाठी सर्व साधारणपणे 1.पशुधनास प्रखर
उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे) 2.
शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.3. गोठयात
स्वच्छता ठेवावी 4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल
एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम
तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर
पाणी हे द्रावण फवारावे.5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून
शेकोटीमध्ये जाळावी. 6. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या
पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. 7. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.
सामुदायिक
विज्ञान
बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक
पातळीस अनुसरून मनोरंजकरित्या गोष्टी सांगाव्या, कारण गोष्टी ऐकल्यामूळे त्यांचा
शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, जिज्ञासा, बौध्दीक, कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती वृध्दिंगत
होते. याबरोबरच त्यांचा वाचा व भाषा भावनात्मक, सामाजिक व नैतिक विकास साधण्यासाठी
गोष्टी लाभदायी ठरतात.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 51/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
23.09.2022
Tuesday, 20 September 2022
मराठवाडयात दिनांक 20 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक
हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 20 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात
तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 22
सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार
पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद,
जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्हयात; दिनांक21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्हयात तर
दिनांक 22 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी
वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर तूर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणी केलेल्या मुग/उडीदाच्या शेंगा सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या मुग/उडीदाच्या शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत रब्बी भुईमूग पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते. रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील तिन दिवसाचा
पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर केळी बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी
बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
फवारणीची कामे पुढे ढकलावीत. पुढील तिन
दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर द्राक्ष बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले
असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. द्राक्ष
बागेत पानांची विरळणी करावी व शेंडा खुडावा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी
मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति
लिटर पाणी याप्रमाणे तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत जिवाणूजन्य करपा
नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची
पूर्व तयारी करावी. पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात
घेता पाऊस झाल्यानंतर सिताफळ बागेत वापसा स्थिती निर्माण
होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था
करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव
दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी
करावी.
भाजीपाला
पुढील तिन
दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती
निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची
व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा
याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन
दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय
भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल
25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या
किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन
5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पुढील तिन
दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती
निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची
व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन
व्यवस्थापन
लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा
घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस
हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो. याच्या
नियंत्रणासाठी सर्व साधारणपणे 1.पशुधनास प्रखर उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये
(सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे) 2. शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर
पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.3. गोठयात स्वच्छता ठेवावी 4.पशुधनाच्या शरीरावर
कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा
वनस्पतीजन्य 10 मिली निम तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम
अंगाचा साबण + 1 लिटर पाणी हे द्रावण फवारावे.5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची
अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावी. 6. आजार सदृश लक्षणे
आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. 7. रोग नियंत्रणासाठी
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे,
जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या
आडोशाला थांबू नये.
सामूदायीक विज्ञान
बालविकासाकरिता बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक पातळीस
अनुसरून मनोरंकरित्या बडबडगीते व गाणी म्हणासवयास लावा. कारण विविध गाण्यातून
बालकांचा शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती विकसित होते.
इतरांसमोर गाणी गायल्यामूळे आत्मविश्वास वाढुन त्यांची व्यक्तिमत्व विकासास मदत
होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 50/
2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 20.09.2022
Friday, 16 September 2022
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात; दिनांक 19 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 20 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दि. 16 व 17 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी, दि. 18 व 19 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दि. 20 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर दिनांक 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला
आहे.
दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2:00 वाजता कृषि महाविद्यालय
सभागृह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे रब्बी शेतकरी मेळावा
आयोजीत करण्यात येत आहे, तरी सर्व शेतकरी बंधूनी याचा लाभ घ्यावा.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल
ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या
व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250
मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200
ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5%
(पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर
पावसाची उघाड बघून फवारावे. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा
थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3%
+ लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित
किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली
प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे. खरीप ज्वारी
पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5%
निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5% भुकटी
प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन 50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस
पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5%
निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य
किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल
5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या
व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस
पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस
50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4%
400 मिली प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. तुर पिकात
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मराठवाडयात तिन दिवसानंतर पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार
असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगा
वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत
याची काळजी घ्यावी. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे,
याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा
र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20%
600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळदीच्या पानावरील ठिपके
याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10
मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे
स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी व
फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर
पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. डाळींब बागेत रोगाच्या
व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5% किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3
ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5
ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1
ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. चिकू
बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी
मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी
ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
चारा पिके
चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत
नेपियर पिकाची पहिली कापणी 65 ते 70
दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
तुती रेशीम
उद्योग
ढगाळ हवामानात पाऊस जास्त असेल तर तुती
लागवडीत तण व गवत वाढते. उघाड पडताच वखराणे पाळी करावी व तण खुरपून घ्यावे.
तणनाशकाचा वापर टाळावा. हराळी जास्त असेल तर कापून घ्यावी नंतर वखर पाळी करावी.
हवेत आर्द्रता 85 टक्केच्या वर असेल तर भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू) प्रादुर्भाव
होतो. पानाच्या मागच्या बाजुस पांढरे डाग दिसतात. पाने कडक होऊन पिवळे पडतात.
बाव्हेस्टीन (कार्बेन्डाझीम) बुरशिनाशक 500 ग्रॅम 250 लिटर पाण्यात मिसळून एकरी
फवारणी करावी व 5 दिवसांनी तुती पाने खाद्य म्हणून किटकांना घालतात.
पशुधन
व्यवस्थापन
लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक
मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय.
यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे
यांचा समावेश होतो. याच्या नियंत्रणासाठी सर्व साधारणपणे 1.पशुधनास प्रखर
उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे) 2.
शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.3. गोठयात
स्वच्छता ठेवावी 4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल
एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम
तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर
पाणी हे द्रावण फवारावे.5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून
शेकोटीमध्ये जाळावी. 6. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या
पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. 7. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.
सामुदायिक
विज्ञान
बालकांची स्व-मदत कौशल्य विकसित होण्यासाठी
त्यांना स्वत:च्याहाताने हाताने दूध पिणे, खाणे, भांग पाडणे, पावडर लावणे, स्वत:च्या
कपडयांच्या गुंडया लावणे अशी कामे मोठयांच्या देखरेखीखाली करू द्यावी.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 49/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
16.09.2022
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...